शहरं
Join us  
Trending Stories
1
“...तर राजकीय एन्काउंटर करु, आमच्या भानगडीत पडू नका”; मनोज जरांगेंचा अमित शाह यांना इशारा
2
मनोज जरांगे पाटील आता दसरा मेळावा घेणार? भव्य कार्यक्रम अन् शक्तिप्रदर्शन, तयारीला वेग!
3
नसरल्लाहच्या मृत्यूनंतर जागतिक दहशतवादी हाशिम सफीद्दीन बनला हिजबुल्लाचा प्रमुख
4
"जर निवडणूक जिंकलो तर...!"; डोनाल्ड ट्रम्प Google वर भडकले, दिला थेट इशारा
5
IPL 2025 : मुंबई इंडियन्सच्या चाहत्यांना खुशखबर; कोणता संघ कोणाला रिटेन करणार, वाचा
6
लेबनॉनचे लष्कर, सरकार गायब! लोक सिरियाकडे पलायन करू लागले, रात्र काढली रस्त्यावर बसून
7
भाजपा नेते हर्षवर्धन पाटलांना राष्ट्रवादीत घेणार का?; शरद पवारांचं मोठं विधान
8
जर CSK नं अनकॅप्ड प्लेयरच्या रुपात MS धोनीला रिटेन केलं तर किती असेल त्याचं पॅकेज?
9
Balasaheb Thorat : 'हर्षवर्धन पाटलांना चांगल्या संधी काँग्रेसमध्ये दिल्या, त्यांचा निर्णय चुकला'; बाळासाहेब थोरातांनी स्पष्टच सांगितलं
10
SL vs NZ 2nd Test: चला पुन्हा एक दिवस सुट्टीचा! परफेक्ट ड्युटीसह लंकेनं चौथ्या दिवशीच किवींचा खेळ केला खल्लास
11
मविआत उद्धव ठाकरेंवर दबाव?; ठाकरे गटाच्या नेत्याचा काँग्रेसला गर्भित इशारा
12
जितेंद्र आव्हाडांकडून खळबळजनक ऑडिओ क्लिप पोस्ट; अक्षय शिंदेची हत्या झाल्याचा दावा
13
'त्या' खेळाडूंवर बंदी घालायलाच हवी; नवीन नियमाचे इरफान पठाणकडून स्वागत; BCCI चे आभार!
14
पितृपक्षात सोम प्रदोष शिवरात्री: ‘या’ गोष्टी अवश्य करा; पितृदोष मुक्तता, महादेव कृपा करतील!
15
"कुठलाही आजार वगैरे झालेला नाही"; सुशांत शेलारने सांगितलं वजन का आणि कसं कमी झालं!
16
₹100000 पार जाणार सोन्याचा भाव...? दिसतोय US Fed च्या निर्णयाचा परिणाम! या वर्षात झाली 30% वाढ
17
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना पितृपक्षाची शुभ सांगता, ऑक्टोबर आणेल अच्छे दिन; अपार यश-लाभ!
18
पितृपक्ष: एकाच दिवशी प्रदोष शिवरात्री शुभ संयोग; कसे करावे व्रत? पाहा, महात्म्य अन् मान्यता
19
धक्कादायक! गाडी नीट चालवायला सांगितली म्हणून पोलिसाची केली हत्या; दिल्लीतील घटना
20
आता IPL मधून माघार घेणाऱ्या खेळाडूला मोजावी लागणार मोठी किंमत; जाणून घ्या नवा नियम

ओमानचा खळबळजनक विजय

By admin | Published: March 10, 2016 3:25 AM

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये धक्कादायक निकाल लावण्यात तरबेज असलेल्या आयर्लंडला बुधवारी अनपेक्षित पराभव पत्करावा लागला. नवख्या ओमानने आपल्या पहिल्याच विश्वचषक स्पर्धेची विजयी

धरमशाला : आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये धक्कादायक निकाल लावण्यात तरबेज असलेल्या आयर्लंडला बुधवारी अनपेक्षित पराभव पत्करावा लागला. नवख्या ओमानने आपल्या पहिल्याच विश्वचषक स्पर्धेची विजयी सुरुवात करताना पात्रता फेरीत तुलनेत बलाढ्य असलेल्या आयर्लंडला २ विकेटने नमवण्याचा पराक्रम केला.सलामीवीर झिशान मकसूद (३८), खवार अली (३४) व मोक्याच्या क्षणी निर्णायक फटकेबाजी करणारा आमेर अली (३२) यांच्या जोरावर ओमानने १५५ धावांचे लक्ष २ चेंडू राखून पार केले. अखेरच्या षटकात ओमानला १५ धावांची आवश्यकता असताना मॅक्स सोरेन्सनने केलेल्या सुमार गोलंदाजीचा फायदा घेत ओमानने खळबळजनक विजय मिळवला. विजयानंतर ओमानच्या खेळाडूंनी विश्वचषक पटकावल्याच्या अंदाजात जल्लोष केला. धावांचा पाठलाग करताना आक्रमक फटकेबाजीने ओमानने आयर्लंडला धोक्याचा इशारा दिला. झिशानने ३३ चेंडंूत ६ चौकारांसह ३३ धावा फटकावल्या. तर, खवारने ४ चौकार व २ षटकारांसह २६ चेंडंूत ३४ धावा कुटल्या. भारतीय वंशाच्या जतिंदर सिंगनेदेखील २४ धावांची संयमी खेळी करून मोलाचे योगदान दिले. मात्र, अखेरच्या क्षणी आयर्लंडची सामन्यावर पकड असताना मैदानात आलेल्या आमेरने १७ चेंडंूत ५ चौकार व एका षटकारासह ३२ धावा फटकावत सामन्याचे चित्र पालटले. आयर्लंडकडून केविन ओब्रायन, अँडी मॅकब्रायन आणि सोरेन्सन यांनी प्रत्येकी २ बळी घेत ओमानला रोखण्याचा अपयशी प्रयत्न केला.तत्पूर्वी, आयर्लंडने नवख्या ओमान विरुद्ध निर्धारित षटकांत ५ बाद १५४ धावांची समाधानकारक मजल मारली. यष्टिरक्षक गॅरी विल्सनने (३६) केलेल्या निर्णायक फलंदाजीच्या जोरावर आयर्लंडला दीडशेचा टप्पा गाठण्यात यश आले. मुनीस अन्सारीने ३७ धावांत ३ खंदे फलंदाज बाद करून आयर्लंडच्या धावसंख्येला ब्रेक लावला. (वृत्तसंस्था)संक्षिप्त धावफलक आयर्लंड : २० षटकांत ५ बाद १५४ धावा (गॅरी विल्सन ३८, पॉल स्टर्लिंग २९, विलियम पोर्टरफिल्ड २९; मुनिस अन्सारी ३/३७) पराभूत वि. ओमान : १९.४ षटकांत ८ बाद १५७ धावा (झिशान मकसूद ३८, खवार अली ३४, आमेर अली ३२; अँडी मॅकब्रायन २/१५, केविन ओब्रायन २/२५, मॅक्स सोरेन्सन २/२९) >>>>>>>>>>>बांगलादेशची बाजीधरमशाला : अखेरच्या क्षणापर्यंत रंगलेल्या चुरशीच्या सामन्यात बांगलादेशाने टी-२० विश्वचषक पात्रता फेरीमध्ये विजयी सलामी देताना झुंजार नेदरलँड्सचे कडवे आव्हान ८ धावांनी परतावले.हिमाचल प्रदेश क्रिकेट संघटनेच्या मैदानावर झालेल्या या सामन्यात सलामीवीर तमीम इक्बालच्या आक्रमक ८३ धावांच्या जोरावर १५३ धावांची मजल मारलेल्या बांगलादेशाने नेदरलँड्सला निर्धारित षटकांत ७ बाद १४५ धावांत रोखण्यात यश मिळविले. संक्षिप्त धावफलक :बांगलादेश : २० षटकांत ७ बाद १५३ धावा (तमीम इक्बाल ८३, सौम्य सरकार १५, शब्बीर रहमान १५; टीम वॅन डेर गुगटन ३/२१, पॉल वॅन मिकेरेन २/१७) वि. वि. नेदरलँड्स : २० षटकांत ७ बाद १४५ धावा. (स्टीफन मायबर्ग २९, पीटर बॉरेन २९, बेन कूपर २०; अल् अमीन हुसेन २/२४, शाकीब अल् हसन २/२८).