पुन्हा एकदा कांस्यपदकावर समाधान

By admin | Published: May 21, 2016 04:58 AM2016-05-21T04:58:05+5:302016-05-21T04:58:05+5:30

चीनची भक्कम भिंत पार करण्यात अपयशी ठरल्याने भारताला उबेर कप बॅडमिंटन स्पर्धेत पुन्हा एकदा कांस्य पदकावर समाधान मानावे लागले

Once again the bronze medal solution | पुन्हा एकदा कांस्यपदकावर समाधान

पुन्हा एकदा कांस्यपदकावर समाधान

Next


कुनशान : संभाव्य विजेत्या चीनची भक्कम भिंत पार करण्यात अपयशी ठरल्याने भारताला उबेर कप बॅडमिंटन स्पर्धेत पुन्हा एकदा कांस्य पदकावर समाधान मानावे लागले. सायना नेहवाल, पी. व्ही. सिंधू आणि ज्वाला गुट्टा - एन. सिक्की रेड्डी या प्रमुख खेळाडूंना आपआपल्या लढतीत हार पत्करावी लागल्याने भारताला ०-३ असा दारुण पराभव पत्करावा लागला.
भारताची अव्वल खेळाडू सायना आणि सिंधू अटीतटीच्या लढतीत पराभूत झाल्यानंतर ज्वाला - रेड्डी जोडीही पहिल्या दुहेरीत पराभूत झाल्याने भारताचे स्पर्धेतील आव्हान संपुष्टा आले. गतवर्षी दिल्लीत झालेल्या स्पर्धेत भारताने प्रथमच कांस्य पटकावून ऐतिहासिक कामगिरी केली होती. मात्र यंदा कामगिरी उंचावण्यात भारतीय संघाला यश आले नाही. थायलंडला ३-१ असे नमवून उपांत्य फेरी गाठल्यानंतर १३ वेळच्या विजेत्या चीनविरुध्द भारत अपयशी ठरला.
सायना व सिंधू यांच्या कामगिरीवर भारताची वाटचाल प्रामुख्याने अवलंबून होती. मात्र दोघींनाही चुरशीच्या सामन्यात पराभव पत्करावा लागला. तीन सेटपर्यंत रंगलेल्या अत्यंत रोमांचक सामन्यात सायनाला ली झुएरेईविरुध्द १५-२१, २१-१२, १७-२१ असा पराभव पत्करावा लागला. विशेष म्हणजे ली विरुध्द सायनाचा हा सलग आठवा पराभव ठरला. यानंतर झुंजार खेळ केलेल्या सिंधूला शिजियान वांगविरुध्द १२-२१, २१-२३ असा पराभव मान्य करावा लागला. तर, टियान क्विंग - झाओ युनलेई यांच्या आक्रमकतेपुढे ज्वाला - सिक्की यांचा ६-२१, ६-२१ असा फडशा पडला. (वृत्तसंस्था)
एकेरीत सायनाने चांगली सुरुवात करताना १०-६ अशी आघाडी मिळवली. मात्र, लीने दमदार पुनरागमन करताना पहिल्या सेटमध्ये बाजी मारली. दुसऱ्या सेटमध्ये २-६ असे पिछाडीवर पडल्यानंतर सायनाने झुंजार खेळाच्या जोरावर ८-८ अशी बरोबरी साधून सलग ९ गुण मिळवताना सामना बरोबरीत आणला. निर्णायक तिसऱ्या सेटमध्ये मात्र १३-१३ अशी बरोबरी साधल्यानंतर चीनी खेळाडूने वेगवान खेळ करुन सामन्यावर कब्जा केला.
दुसऱ्या एकेरीच्या पहिल्या सेटमध्ये सिंधूचा शिजियानविरुद्ध काहीच
निभाव लागला नाही. मात्र दुसऱ्या सेटमध्ये १८-८ अशा मजबूत
आघाडीवर असताना सिंधूकडून काही चूका झाल्या व त्याचा फायदा घेत शिजियानने २०-२० अशी बरोबरी
साधून विजय मिळवला.

Web Title: Once again the bronze medal solution

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.