नवी दिल्ली : स्किर्इंगमध्ये भारताला पहिले आंतरराष्टÑीय पदक जिंकून देणारी मनालीची आंचल ठाकूर हिचे वडील रोशनलाल ठाकूर यांनी कधीकाळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनादेखील पॅराग्लायडिंग शिकविले आहे. २० वर्षांपूर्वींच्या त्या आठवणींना उजाळा मिळाला. मोदी यांच्याकडून आंचलचे अभिनंदन हा रोशनलाल यांच्यासाठी अतिशय गर्वाचा क्षण होता.आंचलने तुर्कस्थान येथे अल्पाईन २३०० कपमध्ये कांस्यपदक जिंकले. भारतात या खेळाची फार कमी चर्चा होते. आंचलचे अभिनंदन करणाºयांत पहिले नाव मोदी यांचेच होते. मोदी यांनी मागच्या वर्षी डिसेंबरमध्ये हिमाचल प्रदेशात झालेल्या एका निवडणूक सभेत रोशनलाल यांचा उल्लेख करीत दोन दशकांआधी सोलांग येथे पॅराग्लायडिंग करण्याची संधी ठाकूर यांनी दिल्याचे म्हटले होते. पंतप्रधानांनी ज्यांचे नाव उच्चारले ते आंचलचे वडील आणि भारतीय शीतकालीन क्रीडा महासंघाचे महासचिव रोशनलाल ठाकूर हेच आहेत.मनाली येथून वृत्तसंस्थेशी बोलताना ठाकूर म्हणाले, ‘मला आज किती गर्व वाटतो, हे मी शब्दांत व्यक्त करू शकत नाही. मोदी मला ओळखतील का, हे माहिती नाही. आंचल माझी मुलगी आहे. ’ठाकूर यांनी शीतकालीन क्रीडा प्रकाराची दशा सुधारण्यासाठी मोदी यांची भेट घेण्याची इच्छा व्यक्त केली. भारतात या खेळाचा विकास करण्याची विनंती करायची असल्याने मी लवकरात लवकर मोदी यांची भेट घेणार असल्याचे ठाकूर यांनी सांगितले. (वृत्तसंस्था)१९९७ मध्ये मोदी भाजपचे हिमाचल प्रदेश प्रभारी या नात्याने दौºयावर होते. सोलांग येथे त्या वेळी ठाकूर यांच्या मार्गदर्शनात हिमाचल इन्स्टिट्यूट आॅफ अॅडव्हेंचर स्पोर्ट्स येथे त्यांनी पॅराग्लायडिंग केले. ‘पावसामुळे हवामान खराब होते. तरीही मोदी हार मानायला तयार नव्हते.अखेर पॅराग्लायडिंग केलेच. तेव्हापासून मोदी सोलांगला आले की सहकाºयांसह पॅराग्लायडिंगचा आनंद लुटायचे. २०१२ ला गुजरातचे मुख्यमंत्री असताना मोदींसोबत फोनवर बोलणे झाले. त्यांनी मला सापुतारा येथे साहसी क्रीडा संस्थेच्या स्थापनेस मदत करण्यास पाचारण केले होते.’
मोदी यांनाही आंचलच्या वडिलांनी दिले पॅराग्लायडिंगचे धडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 12, 2018 2:20 AM