Paralympics 2020 : भाविना पटेलची ऐतिहासिक कामगिरी, भारताचं पहिलं पदक निश्चित

By ऑनलाइन लोकमत | Published: August 27, 2021 04:21 PM2021-08-27T16:21:10+5:302021-08-27T16:30:43+5:30

पॅरालिम्पिक स्पर्धेत भारताच्या भाविना पटेल हिनं ऐतिहासिक कामगिरी करताना महिलांच्या वैयक्तिक C4 गटाच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला.

Paralympics 2020: Indian TT Player Bhavina Patel has stormed into Semis, First Indian  TT player to reach Semis | Paralympics 2020 : भाविना पटेलची ऐतिहासिक कामगिरी, भारताचं पहिलं पदक निश्चित

Paralympics 2020 : भाविना पटेलची ऐतिहासिक कामगिरी, भारताचं पहिलं पदक निश्चित

Next

पॅरालिम्पिक स्पर्धेत भारताच्या भाविना पटेल हिनं ऐतिहासिक कामगिरी करताना महिलांच्या वैयक्तिक C4 गटाच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला. तिनं उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात सर्बियाच्या बोरिस्लाव्हा पेरीच रँकोव्हीचचा सरळ  सेटमध्ये पराभव केला. गतविजेती व जागतिक क्रमांकावर दुसऱ्या स्थानावर असलेल्या सर्बियन खेळाडूचा भारतीय खेळाडूसमोर टिकाव लागलाच नाही. तिनं हा सामना ११-५, ११-६ व ११-७ अशा फरकानं जिंकला. उपांत्य फेरीत प्रवेश करणारी ती पहिली भारतीय टेबल टेनिसपटू ठरली.  ( Bhavina Patel becomes the first Indian Paralympian to be assured of winning a medal as she reaches the semi-finals of table tennis class 4 event.) 



दरम्यान, भाविनाबेन पटेलने सकाळच्या सत्रात ब्राझीलच्या जॉयस डि ओलिवियरावर १२-१०, १३-११, ११-६  असा विजय मिळवला,  ‘आगामी सामन्यात खेळ उंचावण्याचा प्रयत्न असेल. या सामन्यात मी धैर्य कायम ठेवून चेंडूवर लक्ष केंद्रित करण्याचा प्रयत्न केला. कोणताही नकारात्मक विचार न करता केवळ खेळावर लक्ष दिले. प्रत्येक गुणासाठी मी झुंज दिली आणि विजय मिळवण्यात यशस्वी ठरल्याचा आनंद आहे,’ असे भाविनाबेनने सामन्यानंतर सांगितले.

Web Title: Paralympics 2020: Indian TT Player Bhavina Patel has stormed into Semis, First Indian  TT player to reach Semis

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.