Paralympics 2020 : रौप्यही आपले अन् कांस्यही; भारताच्या मरियन थंगवेलू, शरद कुमार यांनी उंच उडीत रचला इतिहास
By ऑनलाइन लोकमत | Published: August 31, 2021 05:15 PM2021-08-31T17:15:52+5:302021-08-31T17:20:48+5:30
Paralympics 2020 : भारताचा नेमबाज अधाना सिंगराज यानं कांस्यपदकाची कमाई करून आजच्या दिवसाचे टोक्यो ऑलिम्पिक स्पर्धेतील भारताचे पदक खाते उघडले
Paralympics 2020 : भारताचा नेमबाज अधाना सिंगराज यानं कांस्यपदकाची कमाई करून आजच्या दिवसाचे टोक्यो ऑलिम्पिक स्पर्धेतील भारताचे पदक खाते उघडले. सायंकाळच्या सत्रात भारताच्या मरियप्पन थंगवेलू व शरद कुमार यांनी पुरुषांच्या उंच उडी T63 गटाच्या अंतिम फेरीत अविश्वसनीय कामगिरी केली. २०१६च्या रिओ पॅरालिम्पिक स्पर्धेतील सुवर्णपदक विजेत्या मरियप्पनला रौप्यपदकावर समाधान मानावे लागले, तर शरद कुमारला १.८३ मीटर उंच उडीसह कांस्यपदकावर समाधान मानावे लागले. भारताच्या खात्यात आता २ सुवर्ण, ५ रौप्य व ३ कांस्यपदकांसह १० पदकं झाली आहेत. पॅरालिम्पिक स्पर्धेतील भारताची ही सर्वोत्तम कामगिरी ठरली आहे.
Just as at Rio 2016, #IND have 2️⃣ athletes in the podium places in Men's High Jump T63 Final! 🔥🔥
— #Tokyo2020 for India (@Tokyo2020hi) August 31, 2021
Mariyappan Thangavelu and Sharad Kumar have won #Silver and #Bronze medals respectively in, taking 🇮🇳's medal tally into double figures! 😍#Tokyo2020#Paralympics#ParaAthleticspic.twitter.com/iwhcvwN9rN
२०१६मध्ये उंच उडीत मरियप्पन थंगावेलूनं सुवर्णपदकाची कमाई केली होती. त्यानं १.८९ मीटर उंच उडी मारली होती आणि मरियप्पन यंदाही जेतेपदाचा प्रबळ दावेदार होता. याच गटात कांस्यपदकही वरूण सिंग भाटी ( १.८६ मी.) याच्या नावावर राहिले होते. ( Mariyappan Thangavelu and Varun Singh Bhati both won medals in the Men's High Jump F42 category at the Rio 2016 Paralympics. Mariyappan won the #Gold whereas Varun Singh won the #Bronze ) . आजच्या फायनलमध्ये वरूण सिंग भाटीनं पहिल्या प्रयत्नात १.६९ मीटर उंच उडी मारली. मरियप्पन व शरद यांनी सहकारी वरूण यापेक्षा अधिक म्हणजे १.७३ मीटर उंच उडी मारण्याचा निर्णय घेतला. ( Varun Singh Bhati successfully attempted the 1.69m height in his first attempt.) आणि या दोघांनी पहिल्याच प्रयत्नात १.७३ मीटरची उंच उडी मारली. दोन अपयशी प्रयत्नानंतर वरूण भाटीनं अखेर १.७३ मीटर उंच उडी मारली.
It's #Bronze for #IND🇮🇳
— Doordarshan Sports (@ddsportschannel) August 31, 2021
Sharad Kumar wins BRONZE Medal in the Men's High Jump T63 Final event.#Tokyo2020 | #Paralympics | #Praise4Para | #ParaAthleticspic.twitter.com/FGHPMYbD9n
त्यानंतर उंच उडीची उंची १.७७ मीटर करण्यात आली. अमेरिकेच्या एर्झा फ्रेंच व सॅम ग्रेव आणि भारताचा मरियप्पन व वरूण यांनी १.७७ मीटरची उंची यशस्वीरित्या पार केली. त्यानंतर मरियप्पननं १.८० मीटर उंच उडी मारून मोठी झेप घेतली. पण, वरुणला तीनही प्रयत्नांत १.८० मीटर उंच उडी मारता आली नाही. त्यामुळे तो पदकाच्या शर्यतीतून बाहेर फेकला गेला. ( Varun is out of medal contention as he fails to clear the 1.80m mark in his third attempt as well) आता भारताचा शरद कुमार व मरियप्पन यांच्यावरच मदार होती आणि या दोघांनी १.८३ मीटर उंच उडी घेत सत्रातील सर्वोत्तम कामगिरीची नोंद केली.
#Athletics: Mariyappan Thangavelu clears 1.83m mark in the Men's High Jump T63 Final event.#Tokyo2020 | #Paralympics | #Praise4Parapic.twitter.com/N2opvuFS4k
— Doordarshan Sports (@ddsportschannel) August 31, 2021
१.८३ मीटरच्या पहिल्या प्रयत्नात मरियप्पन व शरद अपयशी ठरले. अमेरिकेचा सॅम ग्रेव हाही भारतीय खेळाडूंना कडवी टक्कर देत होता. पण, मरियप्पन व शरद यांच्याप्रमाणेच त्यालाही दोन प्रयत्नांत १.८३ मीटर उंच उडी मारता आली नाही. मरियप्पननं तिसऱ्या प्रयत्नांत यश मिळवून सुवर्णपदकावर दावा सांगितला. शरदला तीनही प्रयत्नात अपयश आल्यानं तो सुवर्णपदकाच्या शर्यतीतून बाद झाला आणि त्याला कांस्यपदकावर समाधान मानावे लागले. ( Shared Kumar get bronze medal in the men’s high jump T42 category with a jump of 1.83m) ऑलिम्पिक चॅम्प मरियप्पन व वर्ल्ड चॅम्प ग्रेव यांच्यात सुवर्णपदकाची लढत झाली. या दोघांसमोर १.८८ मीटरचे लक्ष्य होते. मरियप्पनला तीनही प्रयत्नात अपयश आले अन् ग्रेवनं तिसऱ्या प्रयत्नात हे लक्ष्य पार करून मरियप्पनला सुवर्णपदकाच्या शर्यतीतून बाद केले,
It's #Silver for #IND🇮🇳
— Doordarshan Sports (@ddsportschannel) August 31, 2021
Mariyappan Thangavelu wins SILVER Medal in the Men's High Jump T63 Final event.#Tokyo2020 | #Paralympics | #Praise4Para | #ParaAthleticspic.twitter.com/zzRoM1PmTm
नेमबाज सिंघराज अधानाला कांस्य
सिंघराजनं नेमबाजी १० मीटर एअर पिस्तुल SH1 गटाच्या अंतिम फेरीत चिनी खेळाडूंना कडवी टक्कर दिली. अखेरच्या फेरीत जबरदस्त कमबॅक करताना सिंगराजनं २१६.८ गुणांसह कांस्यपदक निश्चित केलं. महिलांच्या १० मीटर एअर पिस्तुल SH1 गटात वर्ल्ड रेकॉर्ड होल्डर रुबिना फ्रान्सिसला अंतिम फेरीत प्रवेश करण्यात अपयश आले. भारतासाठी हा मोठा धक्का होता. महिलांच्या गोळाफेक F34 फायनलमध्ये भाग्यश्री जाधवला ७व्या क्रमांकावर समाधान मानावे लागले. तिनं ७ मीटर लांब गोळाफेक करून सर्वोत्तमक वैयक्तिक कामगिरी केली.
सोमवारी नेमबाज अवनी लेखरा व भालाफेकपटू सुमित अंतिल यांनी सुवर्णपदक पटकावले, तर देवेंद्र झझारियाने भालाफेकीत तसेच योगेश कथुनिया याने थाळीफेकीत रौप्य पदक जिंकले. सुंदरसिंग गुर्जर कांस्यचा मानकरी ठरला.