PKL 2019 : यू मुंबाच्या कर्णधारपदी फझल अत्राचली, उपकर्णधारपद संदीप नरवालकडे
By ऑनलाइन लोकमत | Published: July 17, 2019 03:44 PM2019-07-17T15:44:46+5:302019-07-17T15:47:50+5:30
PKL 2019 : आगामी प्रो कबड्डी लीगच्या मोसमासाठी यू मुंबाने बुधवारी त्यांच्या कर्णधाराची घोषणा केली. फझल अत्राचलीकडे यू मुंबाचे नेतृत्व असणार आहे, तर संदीप नरवाल उपकर्णधार म्हणून काम पाहील.
मुंबई : आगामी प्रो कबड्डी लीगच्या मोसमासाठी यू मुंबाने बुधवारी त्यांच्या कर्णधाराची घोषणा केली. फझल अत्राचलीकडे यू मुंबाचे नेतृत्व असणार आहे, तर संदीप नरवाल उपकर्णधार म्हणून काम पाहील. 20 जुलैपासून सुरू होणाऱ्या प्रो कबड्डीच्या सातव्या मोसमात सलामीच्या लढतीतच यू मुंबाला यजमान तेलुगू टायटन्सचा सामना करावा लागणार आहे. यू मुंबाने 2015 साली प्रो कबड्डीचा किताब पटकावला होता. अंतिम सामन्यात यू मुंबाने 36-30 अशा फरकाने बंगळुरू बुल्सला पराभूत केले होते. त्यानंतर पुढील मोसमात त्यांना उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. पाटणा पाटरेट्सविरुद्ध झालेल्या या चुरशीच्या सामन्यात यू मुंबाला 31-28 असा पराभव पत्करावा लागला होता. त्यानंतर हा संघ पुन्हा जेतेपद पटकावण्यासाठी सज्ज झाला आहे.
🗣️ Mumbai waalon! #VIVOProkabaddi Season 7 is heading your way come 20th July! Be sure to take note of the fixtures and turn up in large numbers to support the #Mumboys.
— ProKabaddi (@ProKabaddi) July 14, 2019
And watch it all LIVE on Star Sports and Hotstar.#IsseToughKuchNahipic.twitter.com/fEhygr3C2F
इराणचा फझल म्हणाला,'' यू मुंबाच्या कर्णधारपदी निवड झाल्याचा आनंद आहे आणि या जबाबदारीमुळे मला उत्तम कामगिरी करण्याची प्रेरणा मिळाली आहे. संघाला जेतेपद पटकावून देण्याचे माझे लक्ष्य आहे.''
संदीप नरवालनेही या निवडीबाबत आनंद व्यक्त केला आहे.
यू मुंबाचे खेळाडू
चढाईपटू - अभिषेक सिंग, अर्जुन देश्वास, अतुल एमएस, डाँग जीओन ली, गौरव कुमार, नवनीत, रोहित बलियान, विनोथ कुमार
बचावपटू - राजगुरु सुब्रमनियम, हर्ष वर्धन, अनील, हरेंद्र कुमार, यंग चँग को, फजल अत्राची, सुरेंद्र सिंग
अष्टपैलू - अजिंक्य करपे, मोहित बलयान, संदीप नरवाल
यू मुंबाचे सामने
20 जुलै - वि. तेलुगू टायटन्स
22 जुलै - वि. जयपूर पिंक पँथर्स
27 जुलै - वि. पुणेरी पलटन
28 जुलै - वि. बंगळुरू बुल्स
31 जुलै - वि. यूपी योद्धा
2 ऑगस्ट - वि. गुजरात सुपरजायंट्स
9 ऑगस्ट - वि. बंगाल वॉरियर्स
16 ऑगस्ट - वि. पाटणा पायरेट्स
19 ऑगस्ट - वि. हरयाणा स्टीलर्स
23 ऑगस्ट - वि. तमीळ थलायवाज
28 ऑगस्ट - वि. दबंग दिल्ली
31 ऑगस्ट - वि. जयपूर पिंक पँथर्स
5 सप्टेंबर - वि. पुणेरी पलटन
11 सप्टेंबर - वि. बंगाल वॉरियर्स
13 सप्टेंबर - वि. तेलुगू टायटन्स
18 सप्टेंबर - वि. यूपी योद्धा
22 सप्टेंबर - वि. गुजरात फॉर्च्युनजायंट्स
27 सप्टेंबर - बंगळुरु बुल्स
30 सप्टेंबर - वि. तमीळ थलायव्हाज
2 ऑक्टोबर - वि. पाटणा पायरेट्स
10 ऑक्टोबर - वि. हरयाणा स्टीलर्स
11 ऑक्टोबर - वि. दिल्ली दबंग