सराव सामना : भारताचा वेस्ट इंडिजवर ४५ धावांनी विजय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 10, 2016 10:39 PM2016-03-10T22:39:11+5:302016-03-10T22:45:14+5:30

भारतीय गोंलदाजानी केलेल्या भेदक माऱ्याच्या जोरावर भारतीय संघाने आयसीसी विश्व टी-२० अभ्यास सामन्यात वेस्ट इंडिजवरला ४५ धावांनी पराभूत केले.

Practice match: India beat West Indies by 45 runs | सराव सामना : भारताचा वेस्ट इंडिजवर ४५ धावांनी विजय

सराव सामना : भारताचा वेस्ट इंडिजवर ४५ धावांनी विजय

Next
>ऑनलाइन लोकमत
कोलकाता, दि. १० - सलामीवीर रोहित शर्माच्या ५७ चेंडूत नाबाद ९८ धावा, युवराज सिंहच्या २० चेंडूत ३१ धावा आणि भारतीय गोंलदाजानी केलेल्या भेदक माऱ्याच्या जोरावर भारतीय संघाने आयसीसी विश्व टी-२० अभ्यास सामन्यात वेस्ट इंडिजवरला ४५ धावांनी पराभूत केले. 
 
भारतीय संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. निर्धारीत २० षटकांत ६ गडी गमावून १८५ धावा केल्या. तर आव्हानाचा पाठलाग करताना विंडीजला निर्धारित १९.२ षटकात सर्व गडी गमावत १४० धावापर्यंतच मजल मारता आली. त्यामुळे भारताने हा सामना ४५ धावांनी खिशात घातला.
 
सलामीवीर रोहित शर्माच्या ५७ चेंडूत नाबाद ९८ धावा, युवराज सिंहच्या २० चेंडूत ३१ धावा आणि शिखर धवनच्या २१ धावा यांच्या फलंदाजीच्या जोरावर भारताने सराव सामन्यात वेस्ट इंडिजला विजयासाठी १८६ धावांचे लक्ष्य दिले होते. भारतीय संघाने दिलेल्या लक्षाचा फाठलाग करताने भारतीय संघाने टिच्चून गोंलदाजी केली भारतातर्फे  
पवन नेगी, रविंद्र जडेजा, हार्दिक पांड्या, आणि शमी यांनी प्रत्येकी दोन गडी बाद केले तर हरभजन सिंह आणि बुमरहा यांनी एका फंलदाजाला बाद केले.
 

Web Title: Practice match: India beat West Indies by 45 runs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.