भारतीय वायुसेना उपउपांत्यपूर्व फेरीत
By admin | Published: April 10, 2015 11:30 PM2015-04-10T23:30:04+5:302015-04-10T23:30:04+5:30
नवी दिल्ली: यष्टिरक्षक फलंदाज देवेंद्र लोचब याच्या शानदार फलंदाजीच्या जोरावर भारतीय वायुसेनेने आज सोनेट क्रिकेट क्लबचा सहा विकेटने पराभव करीत 25व्या अखिल भारतीय ओमनाथ सूद क्रिकेट स्पर्धेच्या उपउपांत्यपूर्व फेरीमध्ये प्रवेश केला आह़े सोनेट क्रिकेट क्लब प्रथम फलंदाजी करताना दिल्लीचा रणजी खेळाडू मिलिंद कुमारच्या नाबाद 100 धावांनंतरदेखील 39़3 षटकात 195च धावा झाल्या़ मिलिंदने 93 चेंडूच्या खेळीमध्ये 13 चौकार आणि दोन षटकार खेचल़े त्याने रिषभ पंत (56) सोबत तिसर्या विकेटसाठी 111 धावांची भागीदारी केली़ वायुसेनाकडून विकास सिंगने तीन तर सौरभ कुमार आणि खालिद अहमद यांनी प्रत्येकी दोन-दोन बळी घेतल़े भारतीय वायुसेनेने लोचबच्या 93 धावांच्या जोरावर 35़3 षटकात चार विकेटवर 198 धावा काढीत विजय मिळवला़ लोचबने कर्णधार सौमिक चटर्जी (30) याच्यासोबत प्
Next
न ी दिल्ली: यष्टिरक्षक फलंदाज देवेंद्र लोचब याच्या शानदार फलंदाजीच्या जोरावर भारतीय वायुसेनेने आज सोनेट क्रिकेट क्लबचा सहा विकेटने पराभव करीत 25व्या अखिल भारतीय ओमनाथ सूद क्रिकेट स्पर्धेच्या उपउपांत्यपूर्व फेरीमध्ये प्रवेश केला आह़े सोनेट क्रिकेट क्लब प्रथम फलंदाजी करताना दिल्लीचा रणजी खेळाडू मिलिंद कुमारच्या नाबाद 100 धावांनंतरदेखील 39़3 षटकात 195च धावा झाल्या़ मिलिंदने 93 चेंडूच्या खेळीमध्ये 13 चौकार आणि दोन षटकार खेचल़े त्याने रिषभ पंत (56) सोबत तिसर्या विकेटसाठी 111 धावांची भागीदारी केली़ वायुसेनाकडून विकास सिंगने तीन तर सौरभ कुमार आणि खालिद अहमद यांनी प्रत्येकी दोन-दोन बळी घेतल़े भारतीय वायुसेनेने लोचबच्या 93 धावांच्या जोरावर 35़3 षटकात चार विकेटवर 198 धावा काढीत विजय मिळवला़ लोचबने कर्णधार सौमिक चटर्जी (30) याच्यासोबत पहिल्या विकेटसाठी 81 आणि रवी चौहान 34 याच्यासोबत दुसर्या विकेटसाठी 86 धावांची भागीदारी केली़ लोचब सामनावीरचा मानकरी ठरला़