ऑनलाइन लोकमत
बंगलोर, दि. 11- रॉयल चॅलेंजर्स बंगलोरनं मुंबई इंडियन्ससमोर 152 धावांचं लक्ष्य ठेवलं आहे. आरसीबीनं निर्धारित 20 षटकांत 4 गड्यांच्या मोबदल्यात 151 धावा केल्या आहेत. मुंबई इंडियन्सनं टॉस जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. कोहलीनं 1 षटकारासह 7 धावा करून शानदार सुरुवात करून दिली. त्यानंतर ख-या अर्थानं के. एल. राहुलनं मैदानावर टिकून राहत धावसंख्या वाढवली. राहुलनं नाबाद खेळी करत 3 चौकार आणि 4 षटकार लगावत 68 धावा करून अर्धशतक पूर्ण केलं. गेल 5, विलियर्स 24, वॉटसन 15 धावा काढून तंबूत परतले. तर सचिन बेबीनं शेवटपर्यंत टिकून राहत 2 चौकार आणि 2 षटकारांसह 25 धावा काढून संघाच्या धावसंख्येत भर टाकली. एकंदरीतच आरसीबीनं दिलेलं 152 धावांचं लक्ष्य पार करण्याचं मुंबई इंडियन्ससमोर आव्हान आहे.