कोल्हापूर : शिर्डी (जि.अहमदनगर) येथील २३ वर्षाखालीला राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत रविवारी शेवटच्या दिवशी कोल्हापूरच्या रोहन रंगराव रंडे याने ८७ किलो वजन गटात ग्री्रको रोमन प्रकारात रौप्यपदक पटकावले. ग्रीको रोमन प्रकारात महाराष्टÑाच्या अन्य मल्लांनी तुल्यबळ लढती केल्या मात्र त्यांच्या पदरी निराशा पडली.कोल्हापूर जिल्ह्यातील मुरगूड येथील लोकनेते सदाशिवराव मंडलिक कुस्ती केंद्रात सराव करणाऱ्या रोहनला ग्रीको रोमन अंतिम सामन्यात हरियाणाच्या आंतरराष्टÑीय मल्ल सुनील याच्याकडून ४-१० असा पराभव पत्करावा लागल्यामुळे रौप्य पदकावर समाधान मानावे लागले.रोहनने स्पर्धेत गोव्याचा राहुलकुमार, पॉँडेचरीचा बालाजी, बिहारचा धर्मराज यांना नमवत अंतिम फेरी गाठली होती. शेवटच्या दिवशी हरियाणाच्या सजन भानवालने ७७ किलो गटात सुवर्णपदक जिंकत जागतिक कुस्ती स्पर्धेसाठी स्थान निश्चित केले. सांघिक कामगिरीत सेनादलाने चार सुवर्ण, दोन रौप्य व तीन कांस्य पदकासह चॅम्पियशिप आपल्या नावे केली. दिल्ली १७० गुणांसह दुसºया, तर हरियाणा १३६ गुणांसह तिसºया स्थानी राहिला.
राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत कोल्हापूरच्या रोहनला रौप्य
By ऑनलाइन लोकमत | Published: September 30, 2019 4:07 AM