‘कूक’ मोडणार सचिन तेंडुलकरचा विक्रम
By admin | Published: May 7, 2016 01:23 AM2016-05-07T01:23:21+5:302016-05-07T01:23:21+5:30
जागतिक क्रिकेटमध्ये अनेक विश्वविक्रमांना गवसणी घातलेल्या मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरच्या सर्वात कमी वयात कसोटी क्रिकेटमध्ये १० हजार धावा फटकावण्याचा विश्वविक्रम
लंडन : जागतिक क्रिकेटमध्ये अनेक विश्वविक्रमांना गवसणी घातलेल्या मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरच्या सर्वात कमी वयात कसोटी क्रिकेटमध्ये १० हजार धावा फटकावण्याचा विश्वविक्रम मोडण्यास इंग्लंडचा कसोटी कर्णधार अॅलेस्टर कूक सज्ज आहे. हा विश्वविक्रम रचण्यासाठी त्याला अवघ्या ३६ धावांची आवश्यकता असून, ‘जर ही किमया केली तर ती आपल्यासाठी विशेष बाब असेल,’ असे मत कूकने व्यक्त केले आहे.
कूक कसोटी क्रिकेटमध्ये वैयक्तिक १० हजार धावांचा टप्पा पार करण्यासाठी ३६ धावांनी दूर आहे. विशेष म्हणजे आगामी १९ मे पासून श्रीलंकेविरुद्ध होणाऱ्या मालिकेत तो हा कीर्तिमान नक्की रचू शकतो. त्याचबरोबर या विक्रमासह इंग्लंडकडून १० हजार कसोटी धावा करणार पहिला फलंदाज म्हणूनही कूक ओळखला जाणार आहे. कूकने म्ह्णाला, ‘‘कोणताही विक्रम उभारण्याचा वेगळा अनुभव असतो. कारण तुम्ही विक्रम रचू शकता याची तुम्हाला कल्पनाही नसते.’’