पुसदची साक्षी मस्के भारतीय वेटलिफ्टिंग संघात
By ऑनलाइन लोकमत | Published: May 29, 2019 09:17 PM2019-05-29T21:17:02+5:302019-05-29T21:18:47+5:30
आफ्रिका खंड- कॉमनवेल्थ जूनियर युथ वेटलिफ्टिंग स्पर्धेत करणार भारताचे प्रतिनिधित्व करणार
यवतमाळ- येथील पुसद तालुक्यातील साक्षी प्रकाश मस्के या खेळाडूची भारतीय वेटलिफ्टिंग संघात निवड करण्यात आली आहे. आफ्रिका खंडतील सामोआ देशात 8 ते 14 जुलै दरम्यान होणारया कॉमनवेल्थ जूनियर एंड युथ वेटलिफ्टिंग स्पर्धेत ती 45 किलो वजनी गटात भारतीय संघाचे प्रतिनिधित्व करणार आहे.
साक्षी ही पुसद येथील श्रीरामपुर येथील रहिवासी असून तिचे वडील प्रकाश मस्के कैटरर्स चा व्यवसाय करतात. तिने पुसदच्या गुणवंतराव देशमुख विद्यालयत 8 वी ते 11 वी पर्यंत शिक्षण घेतले आहे. याचवर्षी तिची पुणे येथील क्रीड़ा प्रबोधनी मधे वेटलिफ्टिंग साठी निवड झाली असून येथे 12 वी चे शिक्षण घेत आहे,
तिला पुसदचे गुणवंतराव देशमुख विद्यायलचे शारिरिक शिक्षक अविनाश कराले, आनंद हेल्थ क्लबचे प्रशिक्षक गोपाल चव्हाण, आनंद करडे, रोशन देशमुख व पुणे क्रीड़ा प्रबोधनीच्या माने मॅडम याचे तिला मोलाचे मार्गदर्शन लाभले आहे.