सौरभ वर्माला विजेतेपद

By admin | Published: October 17, 2016 04:49 AM2016-10-17T04:49:15+5:302016-10-17T04:49:15+5:30

मलेशियाच्या डॅरेन ल्यू याला अंतिम सामन्यात हरवून ५५ हजार डॉलर्स बक्षीस रकमेच्या चिनी तैपेई बॅडमिंटन ग्रां.प्री. स्पर्धेचे एकेरीचे अजिंक्यपद मिळवले.

Saurabh Verma won the championship | सौरभ वर्माला विजेतेपद

सौरभ वर्माला विजेतेपद

Next


तैपेई सिटी : दुखापतीतून सावरणाऱ्या सौरभ वर्माने आज, रविवारी येथे मलेशियाच्या डॅरेन ल्यू याला अंतिम सामन्यात हरवून ५५ हजार डॉलर्स बक्षीस रकमेच्या चिनी तैपेई बॅडमिंटन ग्रां.प्री. स्पर्धेचे एकेरीचे अजिंक्यपद मिळवले.
मध्य प्रदेशच्या २३ वर्षीय सौरभने पहिल्या दोन गेममध्ये पिछाडीवर पडल्यानंतर आगेकूच करीत अजिंक्यपद जिंकले. तिसऱ्या गेममध्ये ल्यू खांद्याच्या दुखापतीमुळे सामन्यातून बाहेर पडला. त्या वेळी सौरभ १२-१0, १२-१0, ३-३ असा आघाडीवर होता. गेल्या वर्षीपासून कोपर आणि घोट्याच्या दुखापतीमुळे जवळजवळ एक वर्षभर तो मैदानाबाहेर राहिला होता. या स्पर्धेपूर्वी सौरभने बेल्जियम आणि पोलंड आंतरराष्ट्रीय स्पर्धेत उपविजेतेपद मिळवले आहे.
आजच्या सामन्यात सौरभने चांगली सुरुवात केली. पहिल्या गेममध्ये तो ५-३ असा आघाडीवर होता. ल्यूने यानंतर सलग पाच पॉर्इंटची कमाई करीत ८-५ ने आघाडी घेतली. तथापि, सौरभने १0-७ असा गेम जिंकला.
दुसऱ्या गेममध्ये ल्यूने चांगली सुरुवात करीत ५-१ अशी आघाडी मिळवली, एक वेळ तो १0-६ असा आघाडीवरही होता, परंतु सौरभने त्यानंतर सलग चार गुण जिंकत बरोबरी साधली. त्यानंतर दोन पॉर्इंट मिळवत गेमही जिंकला.
तिसऱ्या गेममध्ये ३-३ अशी बरोबरी असताना ल्यूने खांदा दुखावल्यामुळे सामना सोडण्याचा निर्णय घेतला. सामन्यानंतर सौरभ म्हणाला, ‘‘माझ्यासाठी हा विजय शानदार आहे, आणि याची मला अतिशय गरज होती. प्रतिस्पर्धी खेळाडूने चांगला खेळ केला. परंतु शेवटी विजय माझ्या पदरात पडल्याने मी आनंदित आहे. आता आपले लक्ष्य पहिल्या ४0मध्ये मानांकन मिळवण्याचे असल्याचेही सौरभने सांगितले.

Web Title: Saurabh Verma won the championship

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.