शिर्केंच्या नावावर शिक्कामोर्तब; ठाकुर करतील घोषणा
By admin | Published: May 22, 2016 02:37 AM2016-05-22T02:37:42+5:302016-05-22T02:37:42+5:30
आपण सचिवपद स्वीकारणार नाही, अशी ‘गुगली’ टाकणाऱ्या महाराष्ट्र क्रिकेट संघटनेचे अजय शिर्के यांचेच नाव सचिवपदासाठी आघाडीवर आहे. त्यांनाच भक्कम दावेदार मानले जात आहे.
सचिन कोरडे, गोवा
आपण सचिवपद स्वीकारणार नाही, अशी ‘गुगली’ टाकणाऱ्या महाराष्ट्र क्रिकेट संघटनेचे अजय शिर्के यांचेच नाव सचिवपदासाठी आघाडीवर आहे. त्यांनाच भक्कम दावेदार मानले जात आहे. त्यामुळे रविवारी (दि.२२) होणाऱ्या बीसीसीआयच्या बैठकीत सचिवपदाचीही औपचारिक घोषणा करण्यात येईल, असे सूत्रांनी सांगितले. असे झाल्यास अनुराग ठाकूर यांच्या जागी अजय शिर्के बीसीसीआयचे नवे सचिव बनतील.
अनुराग ठाकूर यांची बीसीसीआयच्या अध्यक्षपदी बिनविरोध निवड होणे जवळपास निश्चित झाले आहे. ठाकूर अध्यक्ष बनल्यानंतर स्वत: सचिवपदाची घोषणा करतील.
आमसभेसाठी देशभरातील राज्य संघटनांचे पदाधिकारी शनिवारपासून मुंबईत आहेत. आमसभा रविवारी सकाळी ११ वाजता सुरू होईल. त्यामुळे अर्ध्या तासात अध्यक्ष आणि सचिवांच्या नावाची घोषणा करण्यात येईल, असेही गोवा क्रिकेट
संघटनेच्या एका पदाधिकाऱ्याने सांगितले.
दरम्यान, आयसीसीचे अध्यक्ष शशांक मनोहर यांच्या अभिनंदनासाठी शनिवारी खास पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. या पार्टीत
विविध राज्य संघटनांतील सदस्य
तसेच पदाधिकाऱ्यांनी शिर्के
यांना आपले समर्थन जाहीर केले.