न्यूयॉर्क : सेरेना विलियम्सने संघर्षपूर्ण खेळ करीत दोन आठवड्यांपूर्वी तिला पराभूत करणाऱ्या मारिया सकारीविरुद्ध निर्णायक सेटपर्यंत रंगलेल्या लढतीत विजय मिळवला आणि सलग १२ व्यांदा यूएस ओपन टेनिस स्पर्धेत उपांत्यपूर्व फेरीत स्थान निश्चित केले.
तिसºया मानांकित सेरेनाने ग्रीसच्या १५ व्या मानांकित सकारीचा ६-३, ६-७(६), ६-३ ने पराभव केला. सकारीने वेस्टर्न अॅन्ड सदर्न ओपनमध्ये सेरेनाचा पराभव केला होता. सेरेनाने सामन्यादरम्यान स्वत:सोबत जोरजोरात बोलत स्वत:चा उत्साह वाढविला. याबाबत प्रतिक्रिया देताना ती म्हणाली, ‘प्रेक्षक असले किंवा नसले तरी मी बरीच बोलत असते. माझ्यात पॅशन आहे. हे माझे काम आहे. असे बोलून मी स्वत:चा उत्साह वाढवित असते. मी कोर्टवर स्वत:ला झोकून देते.’ मुलाच्या जन्मानंतर तीन वर्षांनी व्यावसायिक टेनिसमध्ये परतणारी ३२ वर्षीय पिरिनकोव्हाने एलिज कोर्नेटवर ६-४, ७-६(५), ६-३ ने विजय साकारला.
अमेरिकेची दुसरी मानांकित सोफिया केनिनला मात्र चौथ्या फेरीच्या पुढे मजल मारता आली नाही. बेल्जियमच्या १६ व्या मानांकित एलिस मर्टेन्सने तिला सरळ सेट््समध्ये ६-३, ६-३ ने पराभूत केले. या निकालामुळे के निनचे सलग दोन ग्रँडस्लॅम जिंकण्याचे स्वप्न भंगले.
रोहन बोपन्ना पराभूत
न्यूयॉर्क : रोहन बोपन्ना व कॅनडाचा त्याचा सहकारी डेनिस शापोवालोव यांना पुरुष दुहेरीच्या उपांत्यपूर्व फेरीत पराभव स्वीकारावा लागल्यामुळे भारताचे स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले. बोपन्ना-शापोवालोव यांना नेदरलँडच्या जीन ज्युलियन रोजर व रोमानियाच्या होरिया टेकाऊ जोडीविरुद्ध ५-७, ५-७ ने पराभव स्वीकारावा लागला.