अंधेरीचा सुयश पाटील ठरला नवोदित ‘मुंबई श्री’  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 27, 2017 04:52 AM2017-11-27T04:52:06+5:302017-11-27T04:52:34+5:30

अंधेरीच्या फॉर्च्युन फिटनेस संघाच्या सुयश पाटीलने अप्रतिम प्रदर्शन करताना नवोदित मुंबई श्री किताब पटकावला. तब्बल २२० युवा शरीरसौष्ठवपटूंचा सहभाग लाभलेल्या या मानाच्या स्पर्धेत विजेतेपदाची अटीतटीची लढत रंगली.

 'Shree Patil' of Andheri is 'Mumbai Shree' | अंधेरीचा सुयश पाटील ठरला नवोदित ‘मुंबई श्री’  

अंधेरीचा सुयश पाटील ठरला नवोदित ‘मुंबई श्री’  

Next

मुंबई : अंधेरीच्या फॉर्च्युन फिटनेस संघाच्या सुयश पाटीलने अप्रतिम प्रदर्शन करताना नवोदित मुंबई श्री किताब पटकावला. तब्बल २२० युवा शरीरसौष्ठवपटूंचा सहभाग लाभलेल्या या मानाच्या स्पर्धेत विजेतेपदाची अटीतटीची लढत रंगली. परळच्या हर्क्युलस जिमच्या समीर भिलारे याने ‘बेस्ट पोझर’चा मान मिळवला.
बृहन्मुंबई शरीरसौष्ठव संघटना आणि मुंबई उपनगर शरीरसौष्ठव आणि फिटनेस संघटना यांच्या संयुक्त विद्यमानाने लालबाग येथील गणेशगल्लीमध्ये या स्पर्धेचा थरार पार पडला. एकूण ७ वजनी गटामध्ये झालेल्या या स्पर्धेत प्रत्येक गटामध्ये ४०-४५ स्पर्धकांची लाभलेली उपस्थिती पाहता आणखी एक गट आयोजकांना वाढवावा लागला. प्रत्येक गटातून १५ शरीरसौष्ठवपटूंची निवड करण्यात आल्यानंतर त्यातून अव्वल ५ गटविजेत्यांची निवड करताना परिक्षकांना घाम फुटला. अनेक गटातील विजेता ठरविण्यासाठी परिक्षकांना कंपेरिझन करावी लागली.
८० किलो वजनी गटातून सहभागी झालेल्या सुयशने गटविजेतेपद पटकावल्यानंतर अंतिम फेरीतही अप्रतिम कौशल्य सादर केले. यावेळी त्याला ८० किलोहून अधिक वजनी गटाचा विजेता नितीन रुपाले याच्याकडून तगडे आव्हान मिळाले. परंतु, सुयशने कोणतेही दडपण न घेता आपल्या पीळदार शरीरयष्टीचे शानदार प्रदर्शन करताना प्रेक्षकांसह परिक्षकांचेही लक्ष वेधले.
त्याचवेळी किशोर राऊत (५५ किलो), साजिद मलिक (६०), विनायक गोळेकर (६५), सुजीत महापत (७०), समीर भिलारे (७५) आणि नितील रुपाले (८०हून अधिक) यांनी आपआपल्या गटात जेतेपद पटकावताना छाप पाडली.

गटनिहाय अव्वल तीन क्रमांक

५५ किलो : १. किशोर राऊत
(परब फिटनेस), २. अविनाश वणे (पॉवर अ‍ॅड), ३. ऋषिकेश परब (कृष्णा जिम), ६० किलो : १. साजिद मलिक (हार्डकोर), २. आकाश घोरपडे (स्लिमवेल), ३. तुषार गुजर (मातोश्री), ६५ किलो : १. विनायक गोळेकर (मातोश्री),
२. चेतन खारवा (ग्रो मसल), ३. आदेश चिंचकर (आर.एम.भट),
७० किलो : १. सुजीत महापत (लीना मोगरे), २. महेश पवार
(पॉवर जिम), ३. आशिष लोखंडे (आर.एम.भट),
७५ किलो : १. समीर भिलारे (हर्क्युलस जिम), २. अमोल जाधव (गुरूदत्त जिम), ३. कल्पेश मयेकर (परब फिटनेस),
८० किलो : १. सुयश पाटील (फॉरच्युन फिटनेस), २. सिद्धीराज परब (रिगल जिम), ३. रोहन कांदळगावकर (फोकस फिटनेस),
८० किलोवरील : १. नितीन रुपाले (परब फिटनेस), २. रविकांत पाष्टे (हर्क्युलस फिटनेस), ३. जावेद सय्यद (एम.जी.फिटनेस)

Web Title:  'Shree Patil' of Andheri is 'Mumbai Shree'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Sportsक्रीडा