सिडनी : ‘व्हॉईस आॅफ क्रिकेट’ अशी ख्याती लाभलेले आॅस्ट्रेलियाचे माजी कर्णधार आणि प्रसिद्ध समालोचक रिची बेनो यांचे वयाच्या ८४व्या वर्षी शुक्रवारी निधन झाले. आॅस्ट्रेलियाच्या सर्वांत प्रभावशाली क्रिकेटपटूंमध्ये गणले जाणारे बेनो त्वचेच्या कर्करोगाने पीडित होते. २०१३च्या अखेरीस एका कार अपघातात ते गंभीर जखमी झाले होते, अशी माहिती चॅनेल नाईनने दिली. बेनो ६३ कसोटी सामने खेळले. त्यांत २,००० धावांशिवाय २०० बळी घेणारे ते पहिले खेळाडू होते. या महान लेगस्पिनर आणि अष्टपैलू खेळाडूच्या नेतृत्वात आॅस्ट्रेलिया २८ सामने खेळला; पण एकही सामना गमावला नाही. १९७०च्या दशकात क्रिकेटमध्ये क्रांती घडविणाऱ्या कॅरी पॅकर मालिकेच्या आयोजनातही त्यांनी मोलाची भूमिका बजावली होती. (वृत्तसंस्था)
क्रिकेटचा आवाज थांबला
By admin | Published: April 11, 2015 4:25 AM