दक्षिण आफ्रिकेने केला आॅस्ट्रेलियाचा सफाया

By admin | Published: October 14, 2016 01:02 AM2016-10-14T01:02:58+5:302016-10-14T01:02:58+5:30

डेव्हिड वॉर्नरच्या दणकेबाज शतकानंतरही दक्षिण आफ्रिकेने पाचव्या आणि अखेरच्या एकदिवसीय आंतरराष्ट्रीय सामन्यात आॅस्ट्रेलियाचा ३१ धावांनी पराभव

South Africa defeats Australia | दक्षिण आफ्रिकेने केला आॅस्ट्रेलियाचा सफाया

दक्षिण आफ्रिकेने केला आॅस्ट्रेलियाचा सफाया

Next

केपटाऊन : डेव्हिड वॉर्नरच्या दणकेबाज शतकानंतरही दक्षिण आफ्रिकेने पाचव्या आणि अखेरच्या एकदिवसीय आंतरराष्ट्रीय सामन्यात आॅस्ट्रेलियाचा ३१ धावांनी पराभव करून मालिकेत ५-० असा सफाया केला.
वॉर्नरने १३६ चेंडूंत १७३ धावांची खेळी केली; परंतु दुसऱ्या बाजूने त्याला तोडीची साथ मिळाली नाही. त्यामुळे दक्षिण आफ्रिकेच्या ८ बाद ३२७ धावांच्या प्रत्युत्तरात आॅस्ट्रेलियाचा संघ २९६ धावांत सर्व बाद झाला. दक्षिण आफ्रिकेने याआधी पहिला वनडे सामना ६ गडी राखून, दुसरा सामना १४२ धावांनी, तिसरा सामना ४ विकेटनी तर चौथा सामना ६ विकेट राखून जिंकला होता. या पराभवानंतरही आॅस्ट्रेलियाचा संघ आयसीसी एकदिवसीय रँकिंगमध्ये अव्वलस्थानी कायम आहे, तर दक्षिण आफ्रिका २ गुणांनी पिछाडीवर असून, ते दुसऱ्या स्थानी आहेत.
त्याआधी रिली रोसेयूने १५६ चेंडूंत १४ चौकार व २ षटकारांसह केलेल्या १२२ धावा आणि त्याने जेपी ड्युमिनीच्या साथीने केलेल्या चौथ्या गड्यासाठीच्या १७८ धावांच्या भागीदारीच्या बळावर दक्षिण आफ्रिकेने ८ बाद ३२७ अशी विशाल धावसंख्या रचली. आॅस्ट्रेलियाकडून ट्रिमेन आणि मेनी यांनी प्रत्येकी ३ गडी बाद केले, तर स्कॉट बोलँडने २ गडी बाद केले. जेपी ड्युमिनीने ७५ चेंडूंत ८ चौकारांसह ७३ आणि डेव्हिड मिलरने २९ चेंडूंत ४ चौकारांसह ३९ धावांची तेजतर्रार खेळी केली. आॅस्ट्रेलियाकडून ट्रिमेन आणि मेनी यांनी प्रत्येकी ३ गडी बाद केले. दुसरीकडे, डेव्हिड वॉर्नरला नशिबाची साथ मिळाली. या डावखुऱ्या फलंदाजाला ११ धावांवर कागिसो रबादाच्या चेंडूंवर क्विंटन डिकॉकने जीवदान दिले. वॉर्नरने त्याच्या खेळीत २४ चौकार मारताना आॅस्ट्रेलियाच्या आशा जिवंत ठेवल्या. तो संघाची धावसंख्या २८८ असताना नवव्या फलंदाजाच्या रूपात बाद झाला.


तो दुसरी चोरटी धाव घेण्याच्या प्रयत्नात पॉइंट सीमारेषेवरून इम्रान ताहीरच्या थेट फेकीद्वारे धावबाद झाला. वॉर्नरशिवाय ट्रेव्हिस हेड आणि मिशेल मार्श यांनी प्रत्येकी ३५ धावा केल्या. दक्षिण आफ्रिकेकडून इम्रान ताहीर व काईल एबोट, रबादा यांनी प्रत्येकी २ गडी बाद केले.

Web Title: South Africa defeats Australia

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.