‘सीएम चषक’ स्पर्धेला राज्यभरातून उत्स्फूर्त प्रतिसाद
By ऑनलाइन लोकमत | Published: November 22, 2018 01:50 AM2018-11-22T01:50:49+5:302018-11-22T01:51:49+5:30
राष्ट्रीय स्तरावर सुरु असलेल्या ‘खेलो इंडिया’ उपक्रमाच्या धर्तीवर राज्यातील तळागाळातील गुणवत्ता शोधण्यासाठी सुरु करण्यात आलेल्या ‘सीएम चषक’ क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेला तुफान प्रतिसाद मिळत आहे.
मुंबई : राष्ट्रीय स्तरावर सुरु असलेल्या ‘खेलो इंडिया’ उपक्रमाच्या धर्तीवर राज्यातील तळागाळातील गुणवत्ता शोधण्यासाठी सुरु करण्यात आलेल्या ‘सीएम चषक’ क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेला तुफान प्रतिसाद मिळत आहे. आतापर्यंतची सर्वात मोठ्या क्रीडा - सांस्कृतिक स्पर्धेत १३ लाखहून अधिक युवांनी आपला सहभाग नोंदवला.
महाराष्ट्रातून १३ लाख ९२ हजार १०२ युवांनी बुधवारी संध्याकाळपर्यंत नोंदणी केली. यातील ५ लाख ४० हजार ८१६ स्पर्धकांनी आॅनलाइन पद्धतीने, तर ८ लाख ५१ हजार २८६ स्पर्धकांनी थेट अर्ज भरुन सहभाग निश्चित केला. या स्पर्धेत क्रिकेट, कबड्डी, खो-खो, व्हॉलिबॉल, कॅरम, कुस्ती, चित्रकला, रांगोळी, कविता, नृत्य इ. स्पर्धा होतील. ‘या स्पर्धेद्वारे राज्यातील प्रत्येक गावातील प्रत्येक कुटुंबाशी जोडण्याचा प्रयत्न असून हा प्रयत्न यशस्वी झाला आहे,’ असे महाराष्ट्र प्रदेश भाजपा युवा मोर्चाचे अध्यक्ष योगेश टिळेकर यांनी म्हटले.