मुंबई : राष्ट्रीय स्तरावर सुरु असलेल्या ‘खेलो इंडिया’ उपक्रमाच्या धर्तीवर राज्यातील तळागाळातील गुणवत्ता शोधण्यासाठी सुरु करण्यात आलेल्या ‘सीएम चषक’ क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेला तुफान प्रतिसाद मिळत आहे. आतापर्यंतची सर्वात मोठ्या क्रीडा - सांस्कृतिक स्पर्धेत १३ लाखहून अधिक युवांनी आपला सहभाग नोंदवला.महाराष्ट्रातून १३ लाख ९२ हजार १०२ युवांनी बुधवारी संध्याकाळपर्यंत नोंदणी केली. यातील ५ लाख ४० हजार ८१६ स्पर्धकांनी आॅनलाइन पद्धतीने, तर ८ लाख ५१ हजार २८६ स्पर्धकांनी थेट अर्ज भरुन सहभाग निश्चित केला. या स्पर्धेत क्रिकेट, कबड्डी, खो-खो, व्हॉलिबॉल, कॅरम, कुस्ती, चित्रकला, रांगोळी, कविता, नृत्य इ. स्पर्धा होतील. ‘या स्पर्धेद्वारे राज्यातील प्रत्येक गावातील प्रत्येक कुटुंबाशी जोडण्याचा प्रयत्न असून हा प्रयत्न यशस्वी झाला आहे,’ असे महाराष्ट्र प्रदेश भाजपा युवा मोर्चाचे अध्यक्ष योगेश टिळेकर यांनी म्हटले.
‘सीएम चषक’ स्पर्धेला राज्यभरातून उत्स्फूर्त प्रतिसाद
By ऑनलाइन लोकमत | Published: November 22, 2018 1:50 AM