SAI Recruitment 2021: स्पोर्ट्स ऑथॉरिटी ऑफ इंडियामध्ये नोकरीची संधी; 1.50 लाख रुपये पगार

By ऑनलाइन लोकमत | Published: May 6, 2021 01:07 PM2021-05-06T13:07:48+5:302021-05-06T13:10:19+5:30

Sports Authority of India Recruitment 2021:  भारतीय क्रीडा प्राधिकरणामध्ये कोच आणि सहाय्यक कोच पदांसाठी अर्ज मागविले आहेत. इच्छुक आणि योग्य उमेदवारांनी साईच्या वेबसाईवर जाऊन ऑनलाईन अर्ज करायचा आहे. 

Sports Authority of India Recruitment 2021: Job opportunities in SAI; Salary of Rs. 1.50 lakhs | SAI Recruitment 2021: स्पोर्ट्स ऑथॉरिटी ऑफ इंडियामध्ये नोकरीची संधी; 1.50 लाख रुपये पगार

SAI Recruitment 2021: स्पोर्ट्स ऑथॉरिटी ऑफ इंडियामध्ये नोकरीची संधी; 1.50 लाख रुपये पगार

Next

Sports Authority of India Recruitment 2021: भारतीय क्रीडा प्राधिकरणामध्ये (Sports Authority of India (SAI)) कोच आणि सहाय्यक कोच पदांसाठी अर्ज मागविले आहेत. येथे एकूण 320 जागा रिक्त आहेत. यासाठी ऑनलाईन अर्ज प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. इच्छुक आणि योग्य उमेदवारांनी साईच्या वेबसाईवर जाऊन ऑनलाईन अर्ज करायचा आहे. (Sports Authority of India (SAI) has issued a recruitment notification for the post of Coach and Assistant Coach.)

Government Job: 10 वी, 12 वी उत्तीर्णांसाठी सरकारी नोकरीची सुवर्णसंधी; 81100 पर्यंत पगार, जाणून घ्या...


भारतीय क्रीडा प्राधिकरणाची (SAI) ची अधिकृत वेबसाईट sportsauthorityofindia.nic.in ही आहे. स्पोर्ट्स ऑथॉरिटी ऑफ इंडिया भरती 2021 साठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 मे आहे. उमेदवारांना चार वर्षांच्या सुरुवातीच्या काळात कंत्राटी पद्धतीने नोकरी दिली जाणार आहे. या काळात दर वर्षी उमेदवारांचा परफॉर्मन्स पाहिला जाणार आहे. त्याचे मुल्यमापन करण्यात येणार आहे. भरतीच्या नोटिफिकेशनची लिंक खाली देण्यात आली आहे. 


रिक्त पदांचे विवरण...(SAI Vacancy 2021 details)
कोच: 100
सहाय्यक कोच: 220
एकूण पदे: 320

शैक्षणिक योग्यता...
कोच पदासाठी SAI, NS NIS तिंवा अन्य मान्यताप्राप्त विद्यापीठाची विंका ऑलिंपिक किंवा विश्व चॅम्पियनशिपमध्ये दोन वेळा विजेता किंवा ऑलिंपिक अथवा आंतरराष्ट्रीय़ स्पर्धेत सहभाग, द्रोणाचार्य पुरस्कार प्राप्त खेळाडूकडून कोचिंग-डिप्लोमा असायला हवा. 
सहाय्यक कोच पदासाठी ज्यांच्याकडे SAI, NS NIS किंवा ऑलिंपिक अथवा आंतरराष्ट्रीय़ स्पर्धेत सहभाग, द्रोणाचार्य पुरस्कार प्राप्त खेळाडूकडून सहाय्यक कोचिंग-डिप्लोमा असायला हवा. 


पगार किती?
कोच पदासाठी 105000 रुपये - 150000 रुपये, सहाय्यक कोच पदासाठी 41420 रुपये - 112400 रुपये एवढा पगार देण्यात येणार आहे. 


SAI भरती 2021 कोच पोस्टसाठी नोटिफिकेशन-इथे क्लिक करा...

SAI भरती 2021 सहाय्यक कोच पोस्टसाठी नोटिफिकेशन-इथे क्लिक करा...

अर्ज करण्यासाठी डायरेक्ट लिंक - इथे क्लिक करा...

 

 

DSSC Group C Recruitment 2021: डिफेंस सर्व्हिस स्टाफ कॉलेज (Defence Services Staff College) ने विविध जागांवर भरतीचे आयोजन केले आहे. यासाठी 10 वी आणि 12 वी पास उमेदवार अर्ज करू शकणार आहेत. यानुसार स्टेनोग्राफर, LDC, सिव्हिल मोटर ड्रायव्हर, कारपेंटर आणि MTS आदी पदांवर इच्छुक उमेदवार अर्ज करू शकणार आहेत. (DSSC Recruitment 2021: Apply for 83 Multi-Tasking Staff, clerk and other posts.)

ग्रुप सी पदांसाठी हे अर्ज मागविण्यात आले आहेत. उमेदवार ऑफलाईन पद्धतीने अर्ज करू शकणार आहेत. 

Defence Services Staff College (DSSC) Recruitment 2021: पदांचे विवरण...
स्टेनोग्राफर- 4 पद
लोअर डिव्हिजन क्लार्क- 10 पद
सिव्हिलियन मोटर ड्रायव्हर- 7 पद
मल्टी टास्किंग स्टाफ- 60 पद
अन्य - 2 पद

शैक्षणिक योग्यता आणि परिक्षेचे स्वरुप...
स्टेनोग्राफर पदासाठी उमेदवारांनी कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठाची 12 वी किंवा समकक्ष परीक्षा पास होणे गरजेचे आहे. स्कील टेस्ट नॉर्मनुसार 10 मिनिटांत 80 शब्द टायपिंग पाहिले जाणार आहे. याशिवाय 50 मिनिटांत इंग्रजी, 65 मिनिटांत हिंदी असे कॉम्प्युटरवर ट्रान्सलेशन करावे लागणार आहे. 

Read in English

Web Title: Sports Authority of India Recruitment 2021: Job opportunities in SAI; Salary of Rs. 1.50 lakhs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.