राज्यस्तरीय कबड्डी : सुवर्णयुग व शिवशक्ती संघांचा अतिम फेरीत प्रवेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 26, 2020 11:19 PM2020-02-26T23:19:39+5:302020-02-26T23:20:22+5:30

महिलांच्या दुसऱ्या उपांत्य फेरीच्या सामन्यात मुंबईच्या शिवशक्ती संघाने पुण्याच्या राजा शिवछत्रपती संघावर 33-21 असा विजय मिळवित अंतिम सामन्यात प्रवेश केला.

State level Kabaddi: suvarnayug and Shiv Shakti teams enter the final round | राज्यस्तरीय कबड्डी : सुवर्णयुग व शिवशक्ती संघांचा अतिम फेरीत प्रवेश

राज्यस्तरीय कबड्डी : सुवर्णयुग व शिवशक्ती संघांचा अतिम फेरीत प्रवेश

Next
ठळक मुद्देमुंबईच्या रेखा सावंत व ज्योती उफाळे यांनी आपल्या नावलौकीका प्रमाणे खेळ करीत आपल्या संघाला विजय मिळवून देण्यात महत्वाचे योगदान दिले.

कोथरुड(पुणे)- पुणे महानगरपालिकेच्या वतीने महाराष्ट्र कबड्डी असोसिएशनच्या मान्यतेने  व पुणे जिल्हा कबड्डी असोसिएशनच्या सहकार्याने राज्यस्तरीय मॅडवरील कोथरुड येथील जीत मैदानावर सुरू असलेल्या पुरूष व महिला खुले गट महापौर चषक कबड्डी स्पर्धेच्या महिला विभागात पुण्याच्या सुवर्णयुग व मुंबईच्या शिवशक्ती संघानी अतिम फेरीत प्रवेश केला. पुरूष विभागात विजय क्लब मुंबई व बाबुराव चांदेरे फौंडेशन या संघानी अंतिम फेरीत प्रवेश केला.


महिलांच्या पहिल्या उपांत्यफेरीच्या सामन्यात सुवर्णयुग स्पोर्टस् संघाने कोल्हापूरच्या जयहनुमान संघ बाचणी संघावर दणदणीत विजय मिळवित अंतिम फेरीत प्रवेश केला. मध्यंतला सुवर्णयुग संघाकडे 12-11 अशी निसटती आघाडी होती. सुवर्णयुगच्या ईश्वरी कोंढाळकर व स्वाती खंदारे यांनी उत्कृष्ठ खेळ करीत आपल्या संघाला विजय मिळवून दिला. त्यांना हर्षदा सोनवणे व सानिका तापकीर यांनी चांगल्या पकडी घेत विजयात मोलाचा वाटा उचलला. जय हनुमान संघाच्या मृणाली टोणपे व प्रतिक्षा पिसे यांनी चांगला प्रतिकार केला. तर भारती पाटील हिने चांगल्या पकडी घेत चांगली लढत दिली.
महिलांच्या दुसऱ्या उपांत्य फेरीच्या सामन्यात मुंबईच्या शिवशक्ती संघाने पुण्याच्या राजा शिवछत्रपती संघावर 33-21 असा विजय मिळवित अंतिम सामन्यात प्रवेश केला. अंतिम सामन्यात त्यांची गाठ सुवर्णयुग संघाशी पडेल. मद्यंतराला शिवशक्ती संघाकडे 16-10 अशी आघाडी होती. मुंबईच्या रेखा सावंत व ज्योती उफाळे यांनी आपल्या नावलौकीका प्रमाणे खेळ करीत आपल्या संघाला विजय मिळवून देण्यात महत्वाचे योगदान दिले. त्यांना सोनम भिलारे चांगल्या पकडी घेत विजयात आपला सहभाग नोंदविला. राजा शिवछत्रपती संघाच्या मानसी रोडे व सिध्दी मराठे यांनी चोफेर चढाया करीत चांगला प्रतिकार केला तर रिध्दी मराठे व नागिंद्रा कुरा यांनी उत्कृष्ठ पकडी घेतल्या. राजा शिवछत्रपती संघाच्या आल्फरा मेनन य़ा बलाढ्य शरीर यष्ठीच्या खेळाडूला खेळविले मात्र त्यांची ही चाल अयशस्वी ठरली.
पुरूषांच्या पहिल्या उपांत्य फेरीत मुंबईच्या विजय क्लब संघाने पुण्याच्या सतेज संघ बाणेर संघावर 40-15 असा विजय मिळवित अंतिम फेरीत प्रवेश केला. मध्यंतराला विजय क्लब संघाकडे 19-7 अशी आघाडी होती. विजय क्लबच्या विजय कापरे याने चौफेर चढाया करीत सतेज संघाचे क्षेत्ररक्षण भेदत आपल्या संघाला विजय मिळवून दिला. त्याला विजय देवकर यांने चांगल्या पकडी घेत आपल्या संघाच्या विजयात मोलाचे योगदान दिले. सतेज संघाच्या शुभम कुभांर व प्रदिप झिरपे यांनी चांगला प्रतिकार केला. मात्र ते सर्वच आघाड्यावर अपयशी ठरल्याने त्यांना पराभवाला सामोरे जावे लागले.  
शेवटच्या चढाई पर्यंत अत्यंत चुरशीच्या झालेल्या सामान्यात बाबुराव चांदेरे फौंडेशन संघाने एनटीपीएस नंदुरबार संघावर 30-29 अशी मात करीत अंतिम फेरीत प्रवेश केला. मद्यंतराला बाबुराव चांदेरे फौंडेशन हा संघ 10-11 असा पिछाडीवर होता. हा सामना निर्धारित वेळेत 24-24 अशा समान गुणांवर संपला. यानंतर हा सामना पाच पाच चढायामध्ये खेळविण्यात  आला. पाच पाच चढायांमध्ये शेवटच्या चढाईत सिध्दार्य़ देसाई याने एनटीपीएसचा खेळाडू टिपत आपल्या संघाला विजय मिळवून दिला. निर्धारित विळेत बाबुराव चांदेरे फौंडेशनच्या सिध्दार्थ देसाई व अक्षय जाधव यांनी उत्कृष्ट खेल केला. तर विकास काळे याने महत्त्वाच्या पकडी घेतल्या. एनटीपीएसच्या शिवराज जाधव व दादा आवाड यांनी उत्कृष्ट चढाया करीत चांगली टक्कर दिली. त्यांना आदीनाथ गवळी याने चांगल्या पकडी घेतल्या मात्र विजयाने त्याच्याकडे पाठ फिरवली,

Web Title: State level Kabaddi: suvarnayug and Shiv Shakti teams enter the final round

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.