राज्यस्तरीय खो-खो : रा. फ. नाईक विद्यालय आणि मध्य रेल्वे
By ऑनलाइन लोकमत | Published: March 1, 2019 05:00 PM2019-03-01T17:00:05+5:302019-03-01T17:00:22+5:30
महाराष्ट्र खो खो असोसिएशनच्या मान्यतेने व शिवनेरी सेवा मंडळ कै. मोहन नाईक राज्यस्तरीय खो-खो स्पर्धेत रा. फ. नाईक विद्यालय आणि मध्य रेल्वे संघांनी अनुक्रमे महिला व पुरुष गटातीचे जेतेपद पटकावले.
मुंबई : महाराष्ट्र खो खो असोसिएशनच्या मान्यतेने व शिवनेरी सेवा मंडळ कै. मोहन नाईक राज्यस्तरीय खो-खो स्पर्धेत रा. फ. नाईक विद्यालय आणि मध्य रेल्वे संघांनी अनुक्रमे महिला व पुरुष गटातीचे जेतेपद पटकावले.
महिला गटाच्या अंतिम सामन्यात ठाण्याच्या रा. फ. नाईक विद्यालय या संघाने शिवभक्त विद्यालय, ठाणे या संघाचा (०५-०५-०२-०२-०८-०५) १५-१२ असा तीन गुणांनी पराभव केला. हा सामना जादा डावात खेळवला गेला. मध्यांतर तसेच पूर्ण चार डावांनंतरही सामना बरोबरीत आला तो प्रियांका भोपी हिच्या संरक्षणामुळे. मात्र जाडा डावात रा. फ. ने खेळ उंचावला व सामना खिशात टाकला. रा. फ. नाईकच्या पौर्णिमा सकपाळने ३:४० , नाबाद ३:२०, १:२० संरक्षण करून आक्रमणात दोन गडी बाद करत अष्टपैलू खेळ केला. व रुपाली बडे हिने २:०० , ३:०० , २:१० मिनिटे संरक्षण केले. प्रणाली मगरने २:००, ३:००, २:१० मिनिटे संरक्षण केले. व आक्रमणात दोन गडी बाद केले. पूजा फडतरेने आक्रमणात तीन गडी बाद केले. शिवभक्ततर्फे खेळताना प्रियांका भोपीने २:१०, नाबाद ४:४० , २:३० मिनिटे संरक्षण केले व आक्रमणात चार गडी बाद केले, कविता घाणेकरने २:१० , २:५० , १:५० मिनिटे सरक्षण केले. तर मनोरम शर्मा आक्रमणात पाच गडी बाद करून चांगली साथ दिली.
पुरुष व्यावसायिक स्पर्धेत मध्य रेल्वे या संघाने पश्चिम रेल्वे या संघाचा (०८-०७-०७-०६) १५-१३ असा दोन गुण व एक मिनिटे राखून पराभव केला. मध्य रेल्वेकडून दीपेश मोरे याने २:००, २:१० मनिटे संरक्षण करत आक्रमणात पाच गडी मिळवत आपल्या खेळाची चमक दाखविली. मिलिंद चावरेकर याने २:००, १:३० मिनिटे संरक्षण केले व आक्रमणात एक गडी बाद केला. तर आदित्य येवरे १:२०, १:०० मिनिटे संरक्षण केले व आक्रमणात दोन गडी बाद केले. पश्चिम रेल्वेकडून रंजन शेट्टी याने १:१५ , १:२० मनिटे संरक्षण करत आक्रमणात चार गडी बाद केले. प्रसाद राडिये याने १:५०, १:५० मिनिटे संरक्षण केले व आक्रमणात एक गडी बाद केले तर दीपक माधव याने तर १:०० , १:१० मिनिटे संरक्षण केले व आक्रमणात तीन गडी बाद करुन चांगली साथ दिली.
तृतीय क्रमांकासाठी महिला राज्यस्तरीय स्पर्धेत आर्यन स्पोर्ट्स क्लब रत्नागिरी या संघाने छत्रपती व्यायाम प्रसारक मंडळ उस्मानाबाद या संघाचा ०९-०५ असा चार गुणांनी पराभव केला. आर्यन स्पोर्ट्स क्लबकडून खेळताना आरती कांबळे हिने २:२० मिनिटे संरक्षण करत आक्रमणात तीन गडी बाद केले तर तन्वी बोरसुतकर हिने १:०० मिनिटे संरक्षण केले व आक्रमणात दोन गडी बाद केले. उस्मानाबादतर्फे वैभवी गायकवाड हिने १:२० मिनिटे संरक्षण करत आक्रमणात दोन गडी बाद करत चांगली लढत दिली.
तृतीय क्रमांकासाठी पुरुष व्यावसायिक स्पर्धेत बृहन्मुंबई महानगर पालिका या संघाने विदुयत महावितरण कंपनी या संघाचा ११-१० असा एक गुणांनी पराभव केला. पालिकेतर्फे लक्ष्मण गवस याने १:१०, १:१० संरक्षण केले व आक्रमणात दोन गडी बाद केले. प्रतीक देवरे याने १:२० , ०:५० मिनिटे संरक्षण केले व आक्रमणात तीन गडी बाद केले तर दुर्वेश साळुंखे याने आक्रमणात तीन गडी बाद केले. महावितरणतर्फे संकेत कदम याने १:३० , मिनिटे संरक्षण करत आक्रमणात दोन गडी बाद केले तर विराज कोठमकर व गजानन शेंगाळ यांनी आक्रमणात प्रत्येकी तीन गडी बाद करून चांगली लढत दिली.
महिला राज्यस्तरीय स्पर्धेतील खेळाडू
सर्वोत्कृष्ट अष्टपैलू :- पौर्णिमा सकपाळ ( रा. फ. नाईक विद्यालय )
सर्वोत्कृष्ट संरक्षक :- रुपाली बडे ( रा. फ. नाईक विद्यालय )
सर्वोत्कृष्ट आक्रमक :- मनोरमा शर्मा ( शिवभक्त विद्यालय )
पुरुष व्यावसायिक राज्यस्तरीय स्पर्धेतील खेळाडू
सर्वोत्कृष्ट अष्टपैलू :- दिपेश मोरे ( मध्य रेल्वे )
सर्वोत्कृष्ट संरक्षक :- मिलिंद चावरेकर ( मध्य रेल्वे )
सर्वोत्कृष्ट आक्रमक :- रंजन शेट्टी ( पश्चिम रेल्वे )