सनील शेट्टी सर्वात महागडा खेळाडू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 22, 2016 04:36 AM2016-06-22T04:36:11+5:302016-06-22T04:36:11+5:30

मुंबई सुपर लीगच्या दुसऱ्या सत्रासाठी मंगळवारी झालेल्या लिलावात अपेक्षेप्रमाणे सनील शेट्टीने (३५ हजार ५००रुपये) सर्वांत महागडा टेबल टेनिसपटू होण्याचा मान मिळवला.

Sunil Shetty most expensive player | सनील शेट्टी सर्वात महागडा खेळाडू

सनील शेट्टी सर्वात महागडा खेळाडू

Next

मुंबई : मुंबई सुपर लीगच्या दुसऱ्या सत्रासाठी मंगळवारी झालेल्या लिलावात अपेक्षेप्रमाणे सनील शेट्टीने (३५ हजार ५००रुपये) सर्वांत महागडा टेबल टेनिसपटू होण्याचा मान मिळवला. मुंबई सुपर लिगच्या पहिल्या सत्रात दमदार कामगिरी करणाऱ्या सनीलला मूळ किमतीच्या दुपटीहून जास्त रक्कम देऊन कूल स्मॅशर्स संघाने आपल्या तंबूत दाखल केले. तर फॅन्टॉम स्टार्स संघाने दिव्या देशपांडेला (२३ हजार ५०० रुपये) महिला गटातील सर्वाधिक रक्कम देत आपल्या संघात स्थान दिले.
मुंबई उपनगर जिल्हा टेबल टेनिस संघटना आणि मुंबई शहर जिल्हा टेबलटेनिस संघटना यांच्या मान्यतेने शहरातील टेबल टेनिसपटूंसाठी या लीगचे आयोजन करण्यात आले आहे. ७ ते १० जुलैदरम्यान स्पर्धेचे सामने वरळीतील नॅशनल स्पोटर््स क्लब आॅफ इंडियाच्या (एनएससीआय) टेबल टेनिस सभागृहात पार पडणार आहेत.
स्पर्धेतील ८० खेळाडूंना पुरुष, महिला, कॅडेट्स, ज्युनियर मुले, ज्युनियर मुली आणि वेटरर्न्स अशा सहा गटात विभागणी करुन १० संघांनी बोली लावली. स्पर्धेत तब्बल ३ लाख ५० हजारांची बक्षीसे ठेवण्यात आली आहेत. शिवाय प्रत्येक गटातील सर्वोत्तम खेळाडूसह पुरुष आणि महिला मालिकावीर असा विशेष पुरस्कारही देण्यात येणार असल्याचे आयोजकांनी सांगितले. पहिल्या सत्राच्या तुफानी प्रतिसादानंतर मुंबईतील एनएससीआय येथील टेबल टेनिस सभागृहात मुंबई सुपर लीगच्या दुसऱ्या सत्राचे बिगुल वाजले. अपेक्षेप्रमाणे पहिल्या सत्रातील टेबल टेनिस स्टार सनीलने सर्वाधिक बोली मिळवली. महिला गटात दिव्या देशपांडेने मैदानाप्रमाणे लिलावातही आपला दबदबा कायम ठेवल्याचे दिसून आले. (क्रीडा प्रतिनिधी)

साखळी पद्धतीने होणाऱ्या स्पर्धेत पुरुष गटात तीन सामने खेळवण्यात येतील. त्यात १ एकेरी आणि २ दुहेरी सामन्यांचा समावेश आहे. महिला गट, ज्युनियर मुले, ज्युनियर मुली गटात प्रत्येकी २ सामने खेळवण्यात येतील. यामध्ये प्रत्येकी १ एकेरी आणि १ दुहेरी सामन्यांचा समावेश असेल. कॅ डेट गटात १ एकेरी सामना होईल. वेटर्न्स गटात १ एकेरी आणि १ दुहेरी असे दोन सामने पार पडतील. १० संघाना दोन गु्रपमध्ये विभागण्यात आले आहे. दोन गटातील सर्वोत्तम दोन संघ उपांत्य फेरीत खेळतील. उपांत्य फेरीतील विजेते अजिंक्यपदासाठी एकमेकांना आव्हान देतील. नवोदितांना अनुभवी खेळाडूंचे ‘आॅन टेबल’ मार्गदर्शन
स्पर्धेत तब्बल १९ राष्ट्रीय स्तरावरच्या खेळाडूंची वर्णी लागलेली आहे. गेल्या वर्षी टेबलटेनिस क्षेत्रात मुंबई सुपर लिग हा प्रयोग होता. माध्यमांच्या आणि खेळाडूंच्या मदतीने तो यशस्वी झाला. यंदा स्पर्धेच्या फॉरमॅटमध्ये बदल केलेला नाही. मात्र खेळाडूंना आर्थिकतेने सक्षम बनवण्यासाठी बक्षीस रुपात रोख रक्कम देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ज्युनियर खेळाडूंना, नवोदितांना अनुभवी खेळाडूंचे मार्गदर्शन ‘आॅन टेबल’ मिळावे, अशा पद्धतीने सामन्यांचे आयोजन करण्यात आले आहे. त्याप्रमाणे संघबांधणी करण्याचे संघमालकांना सांगण्यात आले आहे.
-कमलेश मेहता (अर्जुन पुरस्कार विजेता, ८ वेळा राष्ट्रीय पुरस्कार विजेता )

असे आहेत संघ आणि त्यांचे खेळाडू
ऐस
पुरुष ओमकार तोरगळकर
महिला अश्लेषा त्रेहान
कॅडेटकुशल पटेल
ज्यु. मुलेशिवम दास
ज्यु.मुलीमानसी चिपळुणकर
वेटर्न्स सुहास कुलकर्णी
ब्लेझिंग बॅशर्स
पुरुष परेश मुरेकर
महिला मिसबाह सुमेर
कॅडेटमैनक निस्ताला
ज्यु. मुलेशौर्य पेडणेकर
ज्यु. मुली सृष्टी हलेंगडी
वेटर्न्स जयंत कुलकर्णी
किंग पोंग
पुरुष निलॉय बसक
महिला प्रीती मोकाशी
कॅडेटक्रिश शेट्टी
ज्यु. मुलेमुदित दानी
ज्यु.मुलीमिहिका रोहिरा
वेटर्न्स राजेश सिंग
कूल स्मॅशरर्स
पुरुष सनील शेट्टी
महिला रुचिरा मानेरकर
कॅडेटहविश असरानी
ज्यु. मुलेतन्मय राणे
ज्यु.मुलीक्रिशा अग्रवाल
वेटर्न्स किरण सलियन
सुप्रीम फायटर्स
पुरुष रवींद्र कोटियन
महिला मृण्मयी म्हात्रे
कॅडेटटी.के. श्रीकांत
ज्यु. मुलेहृषिकेश मल्होत्रा
ज्यु.मुलीमनुश्री पाटील
वेटर्न्स हरिष शिरसाट
द टॉप स्पीनर्स
पुरुष निशांत कुलकर्णी
महिला श्वेता पारटे
कॅडेटसहज सिंग
ज्यु. मुलेदेव श्रॉफ
ज्यु.मुलीद्युती पत्की
वेटर्न्स राजेश मुदम
सेंचुरी वॉरियर्स
पुरुष एरिक फर्नांडिस
महिला सेनव्होरा डिसुझा
कॅडेटवेदांत पाटील
ज्यु. मुलेशुभम आंब्रे
ज्यु.मुलीविधी धूत
वेटर्न्स समीर भाटे
हाय टाइड
पुरुष भावितव्य शाह
महिला चार्वी कवळे
कॅडेटराजवीर शाह
ज्यु. मुलेमंदार हर्डीकर
ज्यु.मुलीदिव्या चितळे
वेटर्न्स नितीन वालावलकर
एमटीसी रॉयल्स
पुरुष नोएल पिंटो
महिला मधुरिका पाटकर
कॅडेटजश मोदी
ज्यु. मुलेपार्थव केळकर
ज्यु.मुलीप्रांजल शिंदे
वेटर्न्स प्रकाश केळकर
फँटॉम स्टार्स
पुरुष जिग्नेश राहतवाल
महिलादिव्या देशपांडे
कॅडेट विवान मोहिले
ज्यु. मुलेअश्विन सुब्रम्हण्यम
ज्यु.मुलीअदिती सिन्हा
वेटर्न्स योगेश देसाई

Web Title: Sunil Shetty most expensive player

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.