शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Politics : 'अमित शहांना पवार, ठाकरेंना राजकीयदृष्ट्या संपवण्याचे डोहाळे लागलेत'; ठाकरे गटाचा सामनातून हल्लाबोल
2
सदोष वेल्डिंग, कमकुवत ढाचामुळे कोसळला पुतळा; चौकशी समितीच्या अहवालात निष्कर्ष
3
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: नोकरी करणार्‍यांना लाभाच्या संधी मिळतील; नशिबाची साथ लाभेल
4
पोर्न स्टार रिया बर्डे निघाली बांगलादेशी, बनावट कागदपत्रांसह भारतात राहिल्या प्रकरणी केली अटक
5
विधानसभा निवडणुकीचे वेध; आयोगाची आज पक्षांशी चर्चा, मुख्य सचिव, वरिष्ठ अधिकारी यांची बैठकही घेणार
6
शेतमजूर, कामगारांच्या किमान वेतनात वाढ; केंद्र सरकारचा निर्णय
7
अग्रलेख : विकास किती पाण्यात?; ‘स्मार्ट सिटी’ बनणाऱ्या शहरांना किंचितही अधिकसा पाऊस सोसवेनासा
8
बिल्किस बानो प्रकरणी फेरआढाव्याची गरज नाही; सुप्रीम काेर्टाने फेटाळली गुजरात सरकारची याचिका
9
मेडिकलच्या तीन मुलींनी घेतली सहा जणांची रॅगिंग; मुली एमडी अभ्यासक्रमाच्या
10
लोकमतच्या व्यासपीठावर सर्वपक्षीय नेत्यांची जुगलबंदी; विधानसभेनंतर आणखी पक्ष आमच्याकडे येतील : मुनगंटीवार
11
ड्युटीवरून गायब झालेले १२ पोलिस निलंबित; आरबीआयच्या संरक्षणाची होती जबाबदारी
12
मेट्रोच्या भुयारी मार्गाचे लोकार्पण नरेंद्र मोदींच्या हस्ते ऑनलाईन होणार, नवीन तारीख घोषित
13
कॅन्सरवरील उपचार सुसह्य होण्यासाठी आता ‘डॉग थेरपी’; टाटा रुग्णालयात मुलांसाठी अनोखा उपक्रम
14
शेतकरी नेते रविकांत तुपकरांना पोलिसांकडून अटक, आंदोलन सुरू असतानाच कारवाई
15
हिजबुल्लाहला आणखी एक धक्का, हवाई हल्ल्यात ड्रोन कमांडर ठार, इस्रायलचा दावा
16
शासकीय रुग्णालयांत हृदयविकारांवर अत्याधुनिक उपचार; जे.जे. मध्येही आता ईपी लॅब, ३९ कोटी मंजूर
17
नऊ प्रकल्पांच्या निधीची चिंता मिटली; एमएमआरडीएला ‘पीएफसी’कडून ३१,६७३ कोटींचे कर्ज मंजूर
18
नवी मुंबई विमानतळ सुखोईच्या लँडिंगसाठी सज्ज; सिडकोचे विजय सिंघल यांची माहिती
19
‘काैटुंबिक हिंसाचार कायदा सर्व धर्मांतील महिलांना लागू’
20
मधुमेह, जीवनसत्त्वे, रक्तदाबावरील गोळ्यांसह ५३ औषधे ठरली निकृष्ट दर्जाची

सनील शेट्टी सर्वात महागडा खेळाडू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 22, 2016 4:36 AM

मुंबई सुपर लीगच्या दुसऱ्या सत्रासाठी मंगळवारी झालेल्या लिलावात अपेक्षेप्रमाणे सनील शेट्टीने (३५ हजार ५००रुपये) सर्वांत महागडा टेबल टेनिसपटू होण्याचा मान मिळवला.

मुंबई : मुंबई सुपर लीगच्या दुसऱ्या सत्रासाठी मंगळवारी झालेल्या लिलावात अपेक्षेप्रमाणे सनील शेट्टीने (३५ हजार ५००रुपये) सर्वांत महागडा टेबल टेनिसपटू होण्याचा मान मिळवला. मुंबई सुपर लिगच्या पहिल्या सत्रात दमदार कामगिरी करणाऱ्या सनीलला मूळ किमतीच्या दुपटीहून जास्त रक्कम देऊन कूल स्मॅशर्स संघाने आपल्या तंबूत दाखल केले. तर फॅन्टॉम स्टार्स संघाने दिव्या देशपांडेला (२३ हजार ५०० रुपये) महिला गटातील सर्वाधिक रक्कम देत आपल्या संघात स्थान दिले. मुंबई उपनगर जिल्हा टेबल टेनिस संघटना आणि मुंबई शहर जिल्हा टेबलटेनिस संघटना यांच्या मान्यतेने शहरातील टेबल टेनिसपटूंसाठी या लीगचे आयोजन करण्यात आले आहे. ७ ते १० जुलैदरम्यान स्पर्धेचे सामने वरळीतील नॅशनल स्पोटर््स क्लब आॅफ इंडियाच्या (एनएससीआय) टेबल टेनिस सभागृहात पार पडणार आहेत.स्पर्धेतील ८० खेळाडूंना पुरुष, महिला, कॅडेट्स, ज्युनियर मुले, ज्युनियर मुली आणि वेटरर्न्स अशा सहा गटात विभागणी करुन १० संघांनी बोली लावली. स्पर्धेत तब्बल ३ लाख ५० हजारांची बक्षीसे ठेवण्यात आली आहेत. शिवाय प्रत्येक गटातील सर्वोत्तम खेळाडूसह पुरुष आणि महिला मालिकावीर असा विशेष पुरस्कारही देण्यात येणार असल्याचे आयोजकांनी सांगितले. पहिल्या सत्राच्या तुफानी प्रतिसादानंतर मुंबईतील एनएससीआय येथील टेबल टेनिस सभागृहात मुंबई सुपर लीगच्या दुसऱ्या सत्राचे बिगुल वाजले. अपेक्षेप्रमाणे पहिल्या सत्रातील टेबल टेनिस स्टार सनीलने सर्वाधिक बोली मिळवली. महिला गटात दिव्या देशपांडेने मैदानाप्रमाणे लिलावातही आपला दबदबा कायम ठेवल्याचे दिसून आले. (क्रीडा प्रतिनिधी)साखळी पद्धतीने होणाऱ्या स्पर्धेत पुरुष गटात तीन सामने खेळवण्यात येतील. त्यात १ एकेरी आणि २ दुहेरी सामन्यांचा समावेश आहे. महिला गट, ज्युनियर मुले, ज्युनियर मुली गटात प्रत्येकी २ सामने खेळवण्यात येतील. यामध्ये प्रत्येकी १ एकेरी आणि १ दुहेरी सामन्यांचा समावेश असेल. कॅ डेट गटात १ एकेरी सामना होईल. वेटर्न्स गटात १ एकेरी आणि १ दुहेरी असे दोन सामने पार पडतील. १० संघाना दोन गु्रपमध्ये विभागण्यात आले आहे. दोन गटातील सर्वोत्तम दोन संघ उपांत्य फेरीत खेळतील. उपांत्य फेरीतील विजेते अजिंक्यपदासाठी एकमेकांना आव्हान देतील. नवोदितांना अनुभवी खेळाडूंचे ‘आॅन टेबल’ मार्गदर्शन स्पर्धेत तब्बल १९ राष्ट्रीय स्तरावरच्या खेळाडूंची वर्णी लागलेली आहे. गेल्या वर्षी टेबलटेनिस क्षेत्रात मुंबई सुपर लिग हा प्रयोग होता. माध्यमांच्या आणि खेळाडूंच्या मदतीने तो यशस्वी झाला. यंदा स्पर्धेच्या फॉरमॅटमध्ये बदल केलेला नाही. मात्र खेळाडूंना आर्थिकतेने सक्षम बनवण्यासाठी बक्षीस रुपात रोख रक्कम देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ज्युनियर खेळाडूंना, नवोदितांना अनुभवी खेळाडूंचे मार्गदर्शन ‘आॅन टेबल’ मिळावे, अशा पद्धतीने सामन्यांचे आयोजन करण्यात आले आहे. त्याप्रमाणे संघबांधणी करण्याचे संघमालकांना सांगण्यात आले आहे. -कमलेश मेहता (अर्जुन पुरस्कार विजेता, ८ वेळा राष्ट्रीय पुरस्कार विजेता )असे आहेत संघ आणि त्यांचे खेळाडूऐस पुरुष ओमकार तोरगळकर महिला अश्लेषा त्रेहान कॅडेटकुशल पटेलज्यु. मुलेशिवम दासज्यु.मुलीमानसी चिपळुणकर वेटर्न्स सुहास कुलकर्णी ब्लेझिंग बॅशर्स पुरुष परेश मुरेकर महिला मिसबाह सुमेरकॅडेटमैनक निस्तालाज्यु. मुलेशौर्य पेडणेकर ज्यु. मुली सृष्टी हलेंगडी वेटर्न्स जयंत कुलकर्णी किंग पोंग पुरुष निलॉय बसक महिला प्रीती मोकाशीकॅडेटक्रिश शेट्टीज्यु. मुलेमुदित दानीज्यु.मुलीमिहिका रोहिरावेटर्न्स राजेश सिंगकूल स्मॅशरर्स पुरुष सनील शेट्टी महिला रुचिरा मानेरकरकॅडेटहविश असरानीज्यु. मुलेतन्मय राणेज्यु.मुलीक्रिशा अग्रवाल वेटर्न्स किरण सलियनसुप्रीम फायटर्स पुरुष रवींद्र कोटियन महिला मृण्मयी म्हात्रे कॅडेटटी.के. श्रीकांतज्यु. मुलेहृषिकेश मल्होत्राज्यु.मुलीमनुश्री पाटील वेटर्न्स हरिष शिरसाटद टॉप स्पीनर्सपुरुष निशांत कुलकर्णी महिला श्वेता पारटे कॅडेटसहज सिंगज्यु. मुलेदेव श्रॉफज्यु.मुलीद्युती पत्की वेटर्न्स राजेश मुदमसेंचुरी वॉरियर्सपुरुष एरिक फर्नांडिस महिला सेनव्होरा डिसुझाकॅडेटवेदांत पाटीलज्यु. मुलेशुभम आंब्रेज्यु.मुलीविधी धूतवेटर्न्स समीर भाटे हाय टाइडपुरुष भावितव्य शाह महिला चार्वी कवळे कॅडेटराजवीर शाहज्यु. मुलेमंदार हर्डीकरज्यु.मुलीदिव्या चितळे वेटर्न्स नितीन वालावलकर एमटीसी रॉयल्स पुरुष नोएल पिंटो महिला मधुरिका पाटकर कॅडेटजश मोदीज्यु. मुलेपार्थव केळकर ज्यु.मुलीप्रांजल शिंदे वेटर्न्स प्रकाश केळकरफँटॉम स्टार्स पुरुष जिग्नेश राहतवाल महिलादिव्या देशपांडे कॅडेट विवान मोहिलेज्यु. मुलेअश्विन सुब्रम्हण्यम ज्यु.मुलीअदिती सिन्हावेटर्न्स योगेश देसाई