सनराईजर्स हैदराबादची गाठ सुपरकिंग्सशी
By admin | Published: April 11, 2015 04:29 AM2015-04-11T04:29:42+5:302015-04-11T04:29:42+5:30
आयपीएलचा पहिला सामना खेळणाऱ्या सनराईजर्स हैदराबादला शनिवारी चेन्नई सुपरकिंग्सविरुद्ध त्यांच्या घरच्या मैदानावर लोळविण्याचे अवघड
चेन्नई : आयपीएलचा पहिला सामना खेळणाऱ्या सनराईजर्स हैदराबादला शनिवारी चेन्नई सुपरकिंग्सविरुद्ध त्यांच्या घरच्या मैदानावर लोळविण्याचे अवघड आव्हान राहील. पण विदेशी खेळाडूंच्या बळावर हैदराबाद संघ या परीक्षेत उत्तीर्ण होऊ शकतो.
सलामीच्या लढतीत दिल्ली डेअरडेव्हिल्सला एका धावेने नमविणाऱ्या चेन्नईवर विजय कसा नोंदवायचा, याचा विचार सनराईजर्सच्या डोक्यात घोळत असावा. या संघाचा कर्णधार आॅस्ट्रेलियाचा आक्रमक फलंदाज डेव्हिड वॉर्नर हा आहे. त्याला शिखर धवनची साथ लाभेल. याशिवाय द. आफ्रिकेचा वेगवान गोलंदाज डेल स्टेन, न्यूझीलंडचा वेगवान गोलंदाज ट्रेंट बोल्ट यांना विजयात मोलाची भूमिका वठवावी लागेल. खेळपट्टी फिरकीला अनुकूल असल्याने दोन्ही कर्णधारांना अंतिम ११ खेळाडूंची निवड विचारपूर्वक करावी लागेल.
चेन्नईने काल दीडशे धावा केल्या. या धावांचा बचाव करणे त्यांच्या अंगलट येऊ शकले असते. त्यामुळे किमान १७० धावा फळ्यावर लावण्याच्या इराद्याने धोनी अॅन्ड कंपनी खेळणार आहे. गोलंदाजीत आशिष नेहरा याचा अनुभव आणि अश्विनची फिरकी प्रतिस्पर्धी फलंदाजांवर दडपण आणू शकते.