कोलकाता : गेल्या दोन सामन्यांत पराभवाचे तोंड पाहणाऱ्या कोलकाता नाईट रायडर्सला आयपीएलमध्ये आज रविवारी घरच्या मैदानावर सनरायझर्स हैदराबादवर विजय नोंदविण्याचे आव्हान असेल. हा विजय केकेआरला प्ले आॅफसाठी उपयुक्त ठरणार आहे.कोलकाता आणि हैदराबाद हे आधीच्या सामन्यात हरले आहेत. त्यामुळे दोन्ही संघांना विजयाचेच वेध असतील. कोलकाता संघाचे १३ सामन्यांत सात विजयांसह १४ गुण असून, संघ चौथ्या स्थानावर आहे. हैदराबाद संघ १६ गुणांसह अव्वल स्थानावर कायम आहे. गंभीरसाठी आजचा सामना कठीण परीक्षा असेल. त्यांच्या जमेची बाब म्हणजे, हा सामना त्यांना आपल्या चाहत्यांपुढे खेळायचा आहे. शिवाय, मागच्या सामन्यात केकेआरने हैदराबादला आठ गड्यांनी नमविले होते. केकेआरच्या फलंदाजीची ताकद गंभीर, रॉबिन उथप्पा, युसूफ पठाण हे आहेत. जखमी आंद्रे रसेल यालादेखील पुनरागमनाचे वेध लागले आहेत. पण, त्याच्या खेळण्याबद्दल शंका कायम आहे. गोलंदाजीत उमेश यादव, पीयूष चावला, मोर्ने मोर्केल यांच्यासह ब्रॅड हॉग हे चांगला मारा करू शकतात.
केकेआरपुढे सनरायझर्सचे आव्हान
By admin | Published: May 22, 2016 2:40 AM