रणजी ट्रॉफीत स्वप्नील आणि अंकितची ऐतिहासिक भागिदारी

By Admin | Published: October 14, 2016 05:43 PM2016-10-14T17:43:48+5:302016-10-14T17:43:48+5:30

रणजी ट्रॉफीच्या सामन्यात महाराष्ट्र संघाचा कप्तान स्वप्निल गुगळे आणि अंकित बावणे यांनी ऐतिहासिक भागिदारी केली आहे. या दोघांनी रणजी ट्रॉफीतील आत्तापर्यंतची सर्वाधिक

Swapnil and Ankit's historic partnership in Ranji Trophy | रणजी ट्रॉफीत स्वप्नील आणि अंकितची ऐतिहासिक भागिदारी

रणजी ट्रॉफीत स्वप्नील आणि अंकितची ऐतिहासिक भागिदारी

googlenewsNext
>ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 14 -  रणजी ट्रॉफीच्या सामन्यात महाराष्ट्र संघाचा कप्तान स्वप्निल गुगळे आणि अंकित बावणे यांनी ऐतिहासिक भागिदारी केली आहे. या दोघांनी रणजी ट्रॉफीतील आत्तापर्यंतची सर्वाधिक जास्त ५९४ धावांची भागिदारी आपल्या नावावर केली आहे. दिल्ली विरुद्धच्या या सामन्यात महाराष्ट्राने दोन बाद ६३५ धावांवर दुस-या दिवसाचा डाव घोषित केला आहे.
वानखेडे स्टेडियमवर सुरू असलेल्या या लढतीत पहिल्या दिवशी महाराष्ट्राने २ बाद २९० अशी धावसंख्या उभारली होती. त्यानंतर आजच्या दुस-या दिवशी स्वप्निल गुगळे आणि अंकित बावणे यांनी कमालीची फलंदाची करत धावांचा डोंगर उभा केला. सुरुवातीला २ बाद ४१ अशी बिकट अवस्था झाली होती. सलामीवीर हर्षद खडिवाले(१०) आणि चिराग खुराना (४) यांना नवदीप सैनीने सकाळच्या पहिल्या अर्ध्या तासातच बाद केले होते. त्यानंतर स्वप्निल गुगळे (नाबाद ३५१) आणि अंकित बावणे (नाबाद २५८) यांनी मैदानात टिच्चून फलंदाजी करत संघाला सावरले. तसेच, या दोघांनी रणजी ट्रॉफीतील आत्तापर्यंतची सर्वाधिक जास्त ५९४ धावांची भागिदारी करुन ऐतिहासिक कामगिरी केली आहे. 

Web Title: Swapnil and Ankit's historic partnership in Ranji Trophy

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.