नरिंदर बत्रा यांच्या अध्यक्षपदाचा मार्ग मोकळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 30, 2017 01:14 AM2017-11-30T01:14:15+5:302017-11-30T01:14:41+5:30
: भारतीय आॅलिम्पिक संघटनेच्या (आयओए) आमसभेने बुधवारी एक प्रस्ताव पारित करताच नरिंदर बत्रा यांचा अध्यक्षपदी विराजमान होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
नवी दिल्ली : भारतीय आॅलिम्पिक संघटनेच्या (आयओए) आमसभेने बुधवारी एक प्रस्ताव पारित करताच नरिंदर बत्रा यांचा अध्यक्षपदी विराजमान होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
सर्वोच्च क्रीडा संस्थेच्या विशेष सभेने सर्वानुमते २०१२ व २०१४ मध्ये निर्वाचित झालेले पदाधिकारी तसेच कार्यकारी सदस्यांना १४ डिसेंबर रोजी होणाºया निवडणुकीसाठी उमेदवारी दाखल करण्याची परवानगी बहाल करण्याचा निर्णय घेतला. अध्यक्ष आणि महासचिवपदाची निवडणूक आयओएच्या माजी कार्यकारी परिषदेचे सदस्य किंवा पदाधिकारी हेच लढवू शकतील, अशा आशयाचा ठराव पारित होताच बत्रा यांचे फावले.
अर्धा तास चाललेल्या बैठकीनंतर आयओए उपाध्यक्ष तरलोचनसिंग म्हणाले,‘ २०१२ आणि २०१४ च्या कार्यकारिणीत असलेल्यांपैकी अध्यक्ष किंवा महासचिवपदाची निवडणूक लढवू शकतील, असा ठराव आमसभेने पारित केला आहे.’ मावळते अध्यक्ष एन, रामचंद्रन यांनी एसजीएमकडे पाठ फिरविल्याने वरिष्ठ उपाध्यक्ष वीरेंद्र नानावटी यांनी अध्यक्षपद भूषविले. निर्वाचन अधिकारी एस. कें मेंदिरत्ता यांनी २०१२ व २०१४ च्या कार्यकारिणीत असलेले पदाधिकारीच अध्यक्ष आणि महासचिवपदाची निवडणूक लढवू शकतील, असे आधीच स्पष्ट केले होते. बत्रा यांच्याशिवाय अनिल खन्ना आणि वीरेंद्र प्रसाद वैश्य यांनीही अध्यक्षपदासाठी अर्ज दाखल केले आहेत. (वृत्तसंस्था)
विशेष आमसभेने हरियाणा आॅलिम्पिक संघटनेच्या पी. व्ही. राठी गटाला मान्यता प्रदान केली. याशिवाय बीएफआयला देखील मान्यता प्रदान करण्यात आली. बैठक आटोपताच दोषी ललित भानोत आयोजनस्थळी दाखल झाले. त्यांनी बैठकीला उपस्थित असलेल्या अनेकांसोबत चर्चा केली. भानोत हे २०१२ ला आयओए महासचिव बनले होते. पण आंतरराष्टÑीय आॅलिम्पिक समितीने त्यांच्या निवडीला मान्यता दिली नव्हती.
आयओए निवडणूक: आमसभेने केला प्रस्ताव पारित
४आयओएच्या एका अधिकाºयाने नाव उघड न करण्याच्या अटीवर दिलेल्या माहितीनुसार,‘ खन्ना यांनी बत्रा यांच्या अर्जावर सूचक म्हणून स्वाक्षरी केली असल्याने त्यांचा स्वत:चा अर्ज रद्द होऊ शकतो. वैश्य यांनी बत्रा यांना कव्हर म्हणून अर्ज दाखल केला. ते उमेदवारी मागे घेतील.’