ऑनलाइन लोकमत पुणे, दि. १० - किंग्ज इलेवन पंजाबविरुध्द राजस्थान रॉयल्स यांच्यात सुरु असलेल्या सामन्यात राजस्थान रॉयल्सने पंजाब संघासमोर १६३ धावांचे लक्ष्य ठेवले आहे. किंग्ज इलेवन पंजाबचा कर्णधार जॉर्ज बेलीने टॉस जिंकूण क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. कर्णधाराचा हा निर्णय किती योग्य होता याची चुणूक पंजाबच्या गोलंदाजांनी दाखवली. सलामीला आलेल्या आजिंक्य राहणेला शून्यावर बाद करीत राजस्थानला अनुरीत सिंगने पहिला धक्का दिला. त्यानंतर लगेच संजू सॅमसनला ५ धावांवर असताना संदीप शर्माने तंबूचा रस्ता दाखवला. स्मीथने संघाचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला पण वैयक्तीक ३३ धावांवर असताना तो जॉन्सनचा बळी ठरला. नायरला काही चमकदार खेळी करता आली नाही तो ८ धावा काढून बाद झाला. जम बसलेल्या हुडाला ३० धावावर असताना अनुरीत सिंग बाजूला सारले. जेम्स फॉक्नरच्या सर्वाधिक ४६ धावा आणि मॉरिशच्या नाबाद ६ धावांच्या जोरावर राजस्थानने २० षटकात ७ बाद १६२ धावा केल्या. पंजाबकडून अनुरीत सिंगने ३ , जॉन्सने २ तर पटेल व शर्माला १-१ गडी बाद करण्यात यश मिळाले.
पंजाबसमोर १६३ धावांचे लक्ष्य
By admin | Published: April 10, 2015 9:32 PM