ठाणे : महाराष्ट्र खो-खो असोसिएशनच्या मान्यतेने तसेच ठाणे महानगर पालिका व ठाणे जिल्हा खोखो असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने कोपरी येथील धर्मवीर क्रीडा संकूलात राज्यस्तरीयनिमंत्रित पुरूष व महिला गटाच्या खो-खो स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेत राज्यातील १६ पुरूष व १३ महिला संघ सहभागी होत असून अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर मैदान गाजवणाऱ्या खोखो खेळाडूंचा खेळ पाहण्याची संघी ठाणेकरांना लाभणार आहे. स्पर्धेतील सामने सकाळ व सायंकाळी प्रकाशझोतात होतील. स्पर्धेचे अंतिम सामने १४ डिसें रोजी होतील.
स्पर्धेची गटवारी खालील प्रमाणे :
पुरूष विभाग:अ गट१. विहंग क्रीडा मंडळ, ठाणे२. सरस्वती स्पो. क्लब, मुंबई३. श्री. सह्याद्री संघ, मुंबई उपनगर४. श्रीकृष्ण क्रीडा मंडळ, सातारा
ब गट१. नवमहाराष्ट्र संघ, पुणे२. स्व.अरूणभैया नायकवडी युवा मंच, वाळवा३. ग्रीफीन जिमखाना, ठाणे४.युवक क्रीडा मंडळ, ठाणे
क गट१. हिंदकेसरी , कवठेपिरान२. प्रबोधन क्रीडाभवन, मुंबई उपनगर३. दिनबंधू खो-खो क्लब, सोलापूर४. शिवभक्त क्रीडा मंडळ, ठाणे
ड गट१. शिर्सेकर्स म. गांधी स्पो अकॅडॅमी, मुंबई उपनगर२. ओम समर्थ भारत व्यायाम मंदिर, मुंबई३. छत्रपती व्यायाम प्रसारक मंडळ, उस्मानाबाद४. दि. युनायटेड स्पो. क्लब, ठाणे
महिला विभाग :अ गट१. शिवभक्त विद्यामंदिर, ठाणे२. एकलव्य क्रीडा मंडळ, अहमदनगर३. शिर्सेकर्स म. गांधी स्पो अकॅडॅमी, मुंबई उपनगर
ब गट१. रा.फ.नाईक विद्यालय, ठाणे२. योद्धा क्रीडा मंडळ, सांगली३. साखरवाडी संघ, सातारा
क गट१. नरसिंह क्रीडा मंडळ, पुणे२. आर्यन स्पो. क्लब , रत्नागिरी३. पद्मावती क्रीडा मंडळ, औरंगाबाद४. ईगल्स, पुणे
ड गट१. छत्रपती व्यायाम प्रसारक मंडळ, उस्मानाबाद२. राजश्री शाहू महाराज विद्यालय, ठाणे३. परांजपे स्पो. क्लब , मुंबई उपनगर