...तर मुंबई प्ले ऑफ साठी पात्र ठरेल

By admin | Published: May 22, 2016 06:42 AM2016-05-22T06:42:57+5:302016-05-22T07:27:33+5:30

मुंबईच्या संघाचे प्ले ऑफ मधील स्थान हैदराबाद आणि बेंगळरुच्या विजयावर आवलंबून राहिले आहे. गुजरात लायन्स आणि सनरायझर्स हैदराबाद हे दोन्ही संघ प्ले ऑफ साठी पात्र ठरले आहेत.

... then Mumbai will be eligible for the play-off | ...तर मुंबई प्ले ऑफ साठी पात्र ठरेल

...तर मुंबई प्ले ऑफ साठी पात्र ठरेल

Next
>नामदेव कुंभार, ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. २२ : प्ले ऑफसाठी महत्वाच्या असलेल्या सामन्यात गुजरात लायन्सने गतविजेत्या मुंबई इंडियन्सचा ६ विकेट्सने धुव्वा उडवत मुंबईकरांची स्वप्ने धुळीला मिळवली. त्यामुळे मुंबईच्या संघाचे प्ले ऑफ मधील स्थान हैदराबाद आणि बेंगळरुच्या विजयावर आवलंबून राहिले आहे. गुजरात लायन्स आणि सनरायझर्स हैदराबाद हे दोन्ही संघ प्ले ऑफ साठी पात्र ठरले आहेत. मुंबईसाठी जमेची बाजू ही असेल की गुणतालिकेत प्रथम क्रमांकावर येण्यासाठी कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद विजयाच्या निर्धाराने उतरेल.
 
प्ले ऑफच्या लढतीचा विचार केला तर गुणतालिकेत पहिल्या क्रमांकवार असणारा आणि दुसऱ्या क्रमांकावर असणारे संघ एक लढत जिंकून अंतिम सामन्यात पोहचण्याचा प्रयत्न करेल. म्हणजे क्वालिफायर Vs क्वालिफायर हरणाऱ्या संघाला एक चान्स असतो. तिसऱ्या आणि चौथ्या क्रमांकावर असणाऱ्याला एलिमिनेटर सामना खेळावा लागतो. एलिमिनेटर सामन्यातून जिंकल्यास त्यांना क्वालिफायर मध्ये हरलेल्या संघाबरोबर लढावे लागते. म्हणजे क्वालिफायर(हरलेला) v एलिमिनेटर (जिंकलेला). त्यामुळे केकेआर विरुद्ध हैदराबाद विजयाच्या निर्धाराने उतरेल आणि सामना जिंकून गुणतालिकेत अव्व स्थान मिळवण्याचा प्रयत्न असेल. 
 
मुंबईला प्ले ऑफ मध्ये पाहचण्यासाठी खालील प्रमाणे सामन्याचा निकाल लागणे महत्वाचे आहे. त्याचे काही ठोकताळे आम्ही लावले आहेत.
 
केकेआर - सनरायझर्स :
जर सनरायझर्स हैदराबादची प्रथम फलंदाजी आली तर - हैदराबादला मोठ्या ( अंदाजे ३० - ४०) धावांच्या फरकाने जिंकणे गरजेचं आहे. कोलकाता नाईट रायडर्स पहिली फलंदाजी आली तर हैदराबादचा अंदाजे ८ विकेटने आणि ४-५ षटके राखून विजय मिळवणे गरजेचे आहे. जर कोलकाता जिंकले तर गुजरात, कोलकाता, आणि दिल्ली आणि बँगलोरमधील विजेता संघ प्ले ऑफ साठी पात्र ठरेल. आणि मुंबईचे आव्हान संपुष्टात येईल. त्यामुळे या सामन्यात सनरायझर्स हैदराबादचा मोठ्या फरकाने विजय होणे मुंबईसाठी गरजेच आहे.
      
कोलकातासाठी जमेची बाब म्हणजे, हा सामना त्यांना आपल्या चाहत्यांपुढे खेळायचा आहे. शिवाय, मागच्या सामन्यात केकेआरने हैदराबादला आठ गड्यांनी नमविले होते. केकेआरच्या फलंदाजीची ताकद गंभीर, रॉबिन उथप्पा, युसूफ पठाण हे आहेत. जखमी आंद्रे रसेल यालादेखील पुनरागमनाचे वेध लागले आहेत.
 
बँगलोर-दिल्ली : 
रॉयल चॅलेंजर्स बॅँगलोर संघाची प्रथम फलंदाजी आली तर त्यांचा मोठ्या (४० -५०) धावांनी विजय होणे आवशक आहे. त्याचप्रमाणे त्यांची प्रथम गोलंदाजी आली तर अंदाजे ८ विकेट आणि ४ षटके राखून विजय मिळवणे आवशक. जर बँगलोरने दिल्लीचा मोठ्या फरकाने पराभव केला आणि केकेआर जर हरले तर नेटरणरेटवर मुंबच्या प्लेऑफच्या आशा जिवंत राहू शकतात. 
                     
 
हैदराबाद आणि दिल्ली जिंकले - मुंबई, केकेआर आणि बँगलोरचे १४ गुण होतील. यामधील ज्या संघाचा रनरेट चांगला असेल ता संघ प्ले ऑफसाठी पात्र ठरेल. 
हैदराबाद आणि बँगलोर जिंकले - मुंबई, केकेआर आणि दिल्लीचे समान १४ गुण होतील, ज्यासंघाचा रनरेट चांगला असेल तो संघ प्ले ऑफसाठी पात्र ठरेल. 
केकेआर आणि बँगलोर जिंकले - मुंबई प्ले ऑफ मधून बाहेर जाईल. 
केकेआर आणि दिल्ली जिंकले -  मुंबई, आणि बँगलोर प्ले ऑफ मधून बाहेर 
 
गुणतालिकेतील अव्वल ६ संघ खालीलप्रमाणे आहेत - 
गुजरात संघाने १४ सामन्यात ९ विजयासह १८ गुण मिळवत अव्वल स्थान काबिज केले आहे. 
हैदराबाद संघ १३ सामन्यांत आठ विजयांसह १६ गुणांसह दुसऱ्या स्थानावर आहे. (रनरेट +0.355)
बँगलोर सामन्यात ७ विजयासाह १४ गुण मिळवत तिसरे स्थान काबिज केले आहे. (रनरेट +0.930)
कोलकाता संघाचे १३ सामन्यांत सात विजयांसह १४ गुण असून, संघ चौथ्या स्थानावर आहे. (रनरेट +0.022)
दिल्ली संघाचे १३ सामन्यात १४ गुण आहेत. त्यांनी ७ विजय मिळवले आहेत (रनरेट -0.102)
मुंबई संघाचे साखळीतील सर्व सामने संपले आहेत. १४ गुणांसह ते सहाव्या स्थानावर विराजमान आहेत. (रनरेट -0.146)
 

Web Title: ... then Mumbai will be eligible for the play-off

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.