Tokyo Paralympics 2020: भारताचा 'अचूक' निशाणा! नेमबाजीत मनीष नरवालची 'सुवर्ण', तर सिंघराजची 'रौप्य' पदकाची कमाई
By ऑनलाइन लोकमत | Published: September 4, 2021 09:45 AM2021-09-04T09:45:37+5:302021-09-04T09:46:06+5:30
Tokyo Paralympics 2020: भारताच्या १९ वर्षीय मनीष नरवाल यानं पुरुषांच्या मिक्स ५० मीटर पिस्तल प्रकारात सुवर्ण पदकाला गवसणी घातली आहे.
Tokyo Paralympics 2020: टोकियो पॅरालिम्पिक स्पर्धेत भारतानं नेमबाजीत आणखी दोन पदकांची कमाई केली आहे. भारताच्या १९ वर्षीय मनीष नरवाल यानं पुरुषांच्या मिक्स ५० मीटर पिस्तल प्रकारात सुवर्ण पदकाला गवसणी घातली आहे. तर याच स्पर्धेचं रौप्य पदक देखील भारताच्याच खात्यात जमा झालं आहे. सिंघराज अधाना यानं रौप्य पदकावर नाव कोरलं आहे. मनीष आणि सिंघराज यांच्यात सुवर्ण पदकासाठी कडवी टक्कर पाहायला मिळाली. यात १९ वर्षीय मनीष नरवाल यानं बाजी मारली आणि टोकियो पॅरालिम्पिकमध्ये त्यानं भारताला तिसरं सुवर्ण पदक मिळवून दिलं. ( Tokyo Paralympics 2020: Manish Narwal & Singhraj Adhana wins Gold and Silver in shooting)
News Flash: GOLD & Silver medal for India!
— India_AllSports (@India_AllSports) September 4, 2021
Manish Narwal wins Gold; Singhraj Adhana wins Silver in #Paralympics Mixed 50m pistol SH1 event.
15 medals for India now 🥳🥳 pic.twitter.com/kZHuCivRyU
मनीष नरवाल यानं स्पर्धेची सुरुवातच धमाकेदार केली होती. स्पर्धा सुरू असताना एक वेळ अशी देखील आली की तो सहाव्या क्रमांकापर्यंत घसरला होता. त्यानंतर दमदार पुनरागमन करत अचूक वेध घेत सुवर्ण पदकावर नाव कोरलं. दुसऱ्या बाजूनं ३९ वर्षीय सिंघराज स्पर्धेत सुरुवातीपासूनच टॉप-३ मध्ये कायम होते.
Goosebumps! Indian National Anthem playing at Manish Narwal's Victory Ceremony at #Tokyo2020#Paralympics
— Doordarshan Sports (@ddsportschannel) September 4, 2021
We really 💜 this! pic.twitter.com/aqyo6sxqs2