Paralympics 2021: पॅरालिम्पिकमध्ये भारताचा दबदबा! उंच उडीत प्रवीण कुमारची रौप्य पदकाची कमाई
By ऑनलाइन लोकमत | Published: September 3, 2021 08:58 AM2021-09-03T08:58:09+5:302021-09-03T08:59:15+5:30
Paralympics 2021, Praveen Kumar: टोकियो पॅरालिम्पिकमध्ये भारतीय खेळाडूंकडून पदकांची लयलूट सुरू असून उंच उडीत भारताच्या खात्यात आणखी एक पदक जमा झालं आहे.
Paralympics 2021, Praveen Kumar: टोकियो पॅरालिम्पिकमध्ये भारतीय खेळाडूंकडून पदकांची लयलूट सुरू असून उंच उडीत भारताच्या खात्यात आणखी एक पदक जमा झालं आहे. नोएडाच्या १८ वर्षीय प्रवीण कुमार यानं उंच उडीत टी-४४ गटात २ मीटर उंच उडी घेत रौप्य पदकाची कमाई केली आहे. ग्रेट ब्रिटनच्या ब्रूम-एडवर्ड्स जोनाथन यानं २.१० मीटर उडी घेत सुवर्णपदक कमावलं. तर कांस्य पदकावर पोलंडच्या लेपियाटो मासिएजो यानं नाव कोरलं आहे.
भारताची पदकांची चमकदार कमाई सुरुच; उंच उडीत रौप्य, नेमबाजीतही कांस्य पदक
टोकियोत सुरू असलेल्या पॅरालिम्पिकमध्ये उंच उडीत भारतासाठी हे चौथं पदक ठरलं आहे. याआधी उंच उडीत टी-६३ गटात भारताच्या मरियप्पन थंगावेलु यानंही रौप्य पदकाची कमाई केली. तर शरद कुमार यानं कांस्य पदकाची कमाई केली होती. निषाद कुमार यानं टी-४७ गटात नवा आशियाई रेकॉर्ड प्रस्थापित करत रौप्य पदक जिंकलं आहे.
Absolutely stellar performance by Praveen Kumar to win 🥈 for #IND at #Tokyo2020#Paralympics
— SAI Media (@Media_SAI) September 3, 2021
With confidence and determination Praveen takes India's 🏅 tally to
1️⃣1️⃣
Praveen also set a new Asian Record with the jump of 2.07m👏
🇮🇳 is extremley proud of you!#Cheer4Indiapic.twitter.com/uQBJgaGUK1
पॅरालिम्पिकमध्ये यंदा भारताच्या खात्यात आतापर्यंत एकूण ११ पदकांची कमाई झाली आहे. भारताच्या खात्यात आतापर्यंत २ सुवर्ण, ६ रौप्य आणि ३ कांस्य पदक जमा झाले आहेत. पॅरालिम्पिकमध्ये भारताची ही ऐतिहासिक कामगिरी ठरली आहे. २०१६ साली रिओ पॅरालिम्पिकमध्ये भारतानं २ सुवर्ण आणि ४ रौप्य पदकांची कमाई केली होती.