Tokyo Paralympics: भाविना पटेलचा उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश; अशी कामगिरी करणारी पहिली टेबल टेनिस खेळाडू
By ऑनलाइन लोकमत | Published: August 27, 2021 11:11 AM2021-08-27T11:11:54+5:302021-08-27T11:25:02+5:30
आता उपांत्यपूर्व फेरीत भाविनाबेनची लढत सर्बियाची बोरिस्लावा पेरिच रांकोविच हिच्यासोबत रंगणार आहे.
टोकियो : भारताच्या भाविनाबेन पटेलने पॅरालिम्पिक टेबल टेनिसच्या महिला एकेरी गटात पुन्हा शानदार विजय मिळवत उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला आहे. भाविनाबेन पटेल उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश करणारी भारताची पहिली महिला टेबल टेनिस खेळाडू बनली आहे.
भाविनाबेन पटेलने आज ब्राझीलच्या जॉयस डि ओलिवियरासोबत लढत झाली. यामध्ये तिने १२. १०, १३.११, ११.६ असा पराभव केला. आता उपांत्यपूर्व फेरीत भाविनाबेनची लढत सर्बियाची बोरिस्लावा पेरिच रांकोविच हिच्यासोबत रंगणार आहे.
Tokyo Paralympics: India's paddler Bhavina Patel beats Joyce de Oliveira, storms into quarters
— ANI Digital (@ani_digital) August 27, 2021
Read @ANI Story | https://t.co/JXz9X30B8i#Tokyoparalympics2020pic.twitter.com/OPIKOQtIaH
भाविनाबेनने गुरुवारी टेबल टेनिसच्या महिला एकेरी गटात शानदार खेळ करताना ग्रेट ब्रिटनच्या मेगान शॅकलटन हिचा ३-१ असा पराभव केला. याआधी पहिल्या सामन्यात भाविनाबेनला जागतिक क्रमवारीत अव्वल असलेल्या चीनच्या झोउ यिंगविरुद्ध ०-३ असा पराभव पत्करावा लागला होता. दोन सामन्यांत ३ गुणांची कमाई करत भाविनाबेनने यिंगसह बाद फेरीत प्रवेश केला होता.
‘आगामी सामन्यात खेळ उंचावण्याचा प्रयत्न असेल. या सामन्यात मी धैर्य कायम ठेवून चेंडूवर लक्ष केंद्रित करण्याचा प्रयत्न केला. कोणताही नकारात्मक विचार न करता केवळ खेळावर लक्ष दिले. प्रत्येक गुणासाठी मी झुंज दिली आणि विजय मिळवण्यात यशस्वी ठरल्याचा आनंद आहे,’ असे भाविनाबेनने सामन्यानंतर सांगितले.