Tokyo Paralympics: हरविंदर सिंगनं तिरंदाजीत पदक जिंकून रचला इतिहास, भारताचे आजच्या दिवसातील तिसरे पदक
By ऑनलाइन लोकमत | Published: September 3, 2021 06:04 PM2021-09-03T18:04:21+5:302021-09-03T18:12:22+5:30
Tokyo Paralympics: भारताचा तिरंदाज हरविंदर सिंग यानं शुक्रवारी टोक्यो पॅरालिम्पिक स्पर्धेत ऐतिहासिक कामगिरी केली.
Tokyo Paralympics: भारताचा तिरंदाज हरविंदर सिंग यानं शुक्रवारी टोक्यो पॅरालिम्पिक स्पर्धेत ऐतिहासिक कामगिरी केली. त्यानं पुरुष वैयक्तिक रिकर्व्ह गटात कांस्यपदकासाठीच्या सामन्यात दक्षिण कोरियाच्या किम मिन सू याच्यावर ६-५ असा विजय मिळवला. पॅरालिम्पिक स्पर्धेत तिरंदाजीतील हे भारताचे पहिलेच पदक ठरले. या पदकामुळे भारताच्या खात्यातील पदकसंख्या १३ अशी झाली आहे. ( Harvinder Singh wins bronze in the men's individual recurve event) आजच्या दिवसातील भारताचे हे तिसरे पदक ठरले. याआधी प्रवीण कुमारने (Praveen Kumar) उंच उडीत रौप्य पदक आणि नेमबाज अवनी लेखर हिनं कांस्यपदक जिंकले.
#Bronze Harvinder Singh, you beauty. What a thriller, what a match. 1st #IND to win a medal in #ParaArchery
— Doordarshan Sports (@ddsportschannel) September 3, 2021
Hits bulls eye 🎯 in shoot off against the Korean (8-10). Amazing comeback after almost losing it to the Korean. #Praise4Parapic.twitter.com/pRjPgsiXuZ
Tokyo Paralympics: India's Harvinder Singh wins bronze medal in men's individual recurve open
— ANI (@ANI) September 3, 2021
(Photo credit - Olympic and Paralympic Games Tokyo 2020 for India's Twitter account) https://t.co/rSD392gt4Opic.twitter.com/zve4dyBHRu
Bronze for Harvinder ..!!!
— Sports India (@SportsIndia3) September 3, 2021
Harvinder Singh won Bronze medal in Open Recurve event as he beat Kim (KOR) in shoot-off by 6-5
13th medal for India , first and historical Archery medal for Harvinder 🇮🇳 pic.twitter.com/adJUQFgnmy
News Flash: Medal Alert!
— India_AllSports (@India_AllSports) September 3, 2021
Harvinder Singh creates history by becoming 1st ever Indian archer to win Paralympics medal.
Harvinder got the better of Korean archer 6-5 to win Bronze medal.
its 13th medal for India at #ParalympicsTokyo2020pic.twitter.com/hS3wIoyfq9
अॅथलिट प्रवीण कुमारने (Praveen Kumar) उंच उडीत रौप्य पदक जिंकल्यानंतर भारताच्या खात्यात आणखी एका पदकाची भर पडली आहे. टोकियो पॅरालिम्पिकमधील 50 मीटर राइफल थ्री पोजिशन स्पर्धेत भारताची नेमबाज अवनी लेखरा हिने कांस्यपदक पटकावले आहे. याआधी अवनी लेखरा हिची टोकियो पॅरालिम्पिकमध्ये सुवर्ण कामगिरी पाहायला मिळाली होती. 10 मीटर एअर रायफल स्पर्धेत अवनी लेखराला सुवर्ण पदक मिळाले होते.
भारताचा अॅथलिट प्रवीण कुमारने (Praveen Kumar) देशासाठी आणखी एक रौप्य पदक जिंकले आहे. प्रवीण कुमारने पुरुषांच्या T44 उंच ऊडी स्पर्धेत हा पराक्रम केला. उंच उडीत भारताला मिळालेले हे तिसरे पदक आहे. यापूर्वी निषाद कुमार आणि मरियप्पन यांनी भारतासाठी रौप्य पदके जिंकली होती. प्रवीण कुमारने पुरुषांच्या उंच उडी टी 64 स्पर्धेत 2.07 मीटरची नोंद केली. हा आशियाई विक्रम ठरला आहे. ब्रिटनच्या जोनाथन ब्रूम-एडवर्ड्सने 2.10 मीटरसह सुवर्ण, तर पोलंडच्या मॅसिज लेपियाटोने 2.04 मीटरसह कांस्य पदक जिंकले.