Tokyo Paralympics: भारताचा तिरंदाज हरविंदर सिंग यानं शुक्रवारी टोक्यो पॅरालिम्पिक स्पर्धेत ऐतिहासिक कामगिरी केली. त्यानं पुरुष वैयक्तिक रिकर्व्ह गटात कांस्यपदकासाठीच्या सामन्यात दक्षिण कोरियाच्या किम मिन सू याच्यावर ६-५ असा विजय मिळवला. पॅरालिम्पिक स्पर्धेत तिरंदाजीतील हे भारताचे पहिलेच पदक ठरले. या पदकामुळे भारताच्या खात्यातील पदकसंख्या १३ अशी झाली आहे. ( Harvinder Singh wins bronze in the men's individual recurve event) आजच्या दिवसातील भारताचे हे तिसरे पदक ठरले. याआधी प्रवीण कुमारने (Praveen Kumar) उंच उडीत रौप्य पदक आणि नेमबाज अवनी लेखर हिनं कांस्यपदक जिंकले.
भारताचा अॅथलिट प्रवीण कुमारने (Praveen Kumar) देशासाठी आणखी एक रौप्य पदक जिंकले आहे. प्रवीण कुमारने पुरुषांच्या T44 उंच ऊडी स्पर्धेत हा पराक्रम केला. उंच उडीत भारताला मिळालेले हे तिसरे पदक आहे. यापूर्वी निषाद कुमार आणि मरियप्पन यांनी भारतासाठी रौप्य पदके जिंकली होती. प्रवीण कुमारने पुरुषांच्या उंच उडी टी 64 स्पर्धेत 2.07 मीटरची नोंद केली. हा आशियाई विक्रम ठरला आहे. ब्रिटनच्या जोनाथन ब्रूम-एडवर्ड्सने 2.10 मीटरसह सुवर्ण, तर पोलंडच्या मॅसिज लेपियाटोने 2.04 मीटरसह कांस्य पदक जिंकले.