Tokyo Paralympics: भारताचा पॅरालिम्पिकमध्ये 'सुवर्ण' इतिहास! बॅडमिंटनपटू कृष्णा नागरनं जिंकलं 'गोल्ड'
By ऑनलाइन लोकमत | Published: September 5, 2021 10:07 AM2021-09-05T10:07:49+5:302021-09-05T10:10:20+5:30
Tokyo Paralympics: टोकियो पॅरालिम्पिकच्या अखेरच्या दिवशी देखील भारतीय खेळाडूंकडून पदकांची लयलूट सुरू आहे.
Tokyo Paralympics: टोकियो पॅरालिम्पिकच्या अखेरच्या दिवशी देखील भारतीय खेळाडूंकडून पदकांची लयलूट सुरू आहे. भारताला टोकियो पॅरालिम्पिकमध्ये आज दुसरं पदक मिळालं आहे. भारताच्या कृष्ण नागर यानं एसएच-६ प्रकारात चीनच्या के चू मैन कै याचा पराभव करत सुवर्ण पदकाची कमाई केली आहे. तिसऱ्या सेटपर्यंत रंगलेल्या या सामन्यात कृष्णा नागर यानं चीनी प्रतिस्पर्ध्यावर २१-१७, १६-२१,२१-१७ असा पराभव केला. (Tokyo paralympics krishna nagar won gold medal for india in badminton)
Tokyo Paralympics, Badminton Men's Singles SH6: Krishna Nagar beats Kai Man Chu to win Gold pic.twitter.com/r6jpcFhxuc
— ANI (@ANI) September 5, 2021
टोकियो पॅरालिम्पिकचा आजचा शेवटचा दिवस असून आजच्या दिवसाची सुरुवात भारतासाठी चांगली झाली आहे. दिवसाच्या सुरुवातीलाच भारतीय बॅडमिंटनपटू आणि गौतम बुद्ध नगरचे जिल्हाधिकारी सुहास एल यथिराज यांनी टोकियो पॅरालिम्पिकमध्ये रौप्य पदकाची कमाई केली. फ्रान्सच्या वर्ल्ड नंबर वन लुकास मजूर विरुद्धच्या ६३ मिनिटांच्या लढाईत १५-२१, २१-१७,२१-१५ असा पराभव झाला.
5th 🥇 for 🇮🇳 at #Paralympics@Krishnanagar99 clinches GOLD by defeating #HKG Kai Man Chu 2-1 in a thrilling Men’s Singles SH6 Final
— SAI Media (@Media_SAI) September 5, 2021
You have fulfilled your dream with hard work & determination & for that, we are proud!
A well-deserved win! Keep shining 🌟#Cheer4Indiapic.twitter.com/yqAyVAEdMx
टोकियो पॅरालिम्पिकमध्ये भारताच्या खात्यातील पदकांची संख्या आता १९ वर पोहोचली आहे. कृष्णा नागर यानं भारताला पाचवं सुवर्ण पदक जिंकून दिलं आहे. शनिवारी प्रमोद भगत यानंही सुवर्ण पदकाची कमाई केली. त्याआधी मनीष नरवाल यानं ५० मीटर पिस्तल, अवनी लेखरा हिनं १० मीटर पिस्तल आणि सुमित अंतिल यानं भालाफेकीत सुवर्ण पदकाची कमाई केली आहे. भारताच्या खात्यात आता ५ सुवर्ण, ८ रौप्य आणि ६ कांस्य पदकांची कमाई झाली आहे. पॅरालिम्पिकमध्ये भारताची ही आजवरची सर्वोत्तम कामगिरी ठरली आहे. याआधी रिओ पॅरालिम्पिकमध्ये भारतानं २ सुवर्ण आणि ४ रौप्य पदकांची कमाई केली होती.
#WATCH Family, friends, coach of para-badminton player Krishna Nagar gathered at SMS Stadium in Jaipur break into celebration as he wins Gold medal in Badminton Men's Singles SH6 event at 2020 Tokyo Paralympic Games pic.twitter.com/bnmsPKQ7R5
— ANI (@ANI) September 5, 2021