Tokyo Paralympics: टोक्यो पॅरालिम्पिक स्पर्धेत शनिवारचा दिवस भारतीय बॅडमिंटनपटूंनी गाजवला. प्रथमच पॅरालिम्पिक स्पर्धेत समाविष्ठ करण्यात आलेल्या बॅडमिंटन क्रीडा प्रकारात भारताच्या प्रमोद भगतने सुवर्णपदक, मनोज सरकारनं कांस्यपदक जिंकले. भारतानं यंदाच्या पॅरालिम्पिक स्पर्धेत चार सुवर्ण, ७ रौप्य व ६ कांस्य अशी एकूण १७ पदकांची कमाई केली. भारताला आणखी एक सुवर्णपदक खुणावत आहे आणि हे पदकही ऐतिहासिक ठरणार आहे. सुहास लालिनाकेरे यथीराज ( Suhas Lalinakere Yathiraj ) यांनी बॅडमिंटनच्या SL 4 गटाच्या अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. रविवारी ३८ वर्षीय सुहास सुवर्णपदकासाठी कोर्टवर उतरणार आहेत. या सामन्याचा निकाल काही लागला, तरी सुहास इतिहास रचणार आहेत. पॅरालिम्पिक स्पर्धेत पदक जिंकणारे ते पहिले IAS अधिकारी ठरणार आहेत.
Neearaj Chopra : नीरज चोप्राला विचारला गेला 'Sex Life' बद्दल प्रश्न; आणि मग सोशल मीडियावर...
सुहास हे नॉएडा येथील गौतम बुद्धनगर येथे जिल्हाधिकारी आहेत. शनिवारी झालेल्या उपांत्य फेरीत त्यांनी इंडोनेशियाच्या फ्रेडी सेटीवनचा २१-९, २१-१५ असा अवघ्या ३१ मिनिटांत पराभव केला. २००७च्या बॅचमधील IAS अधिकारी असलेल्या सुहास यांना अंतिम फेरीत फ्रान्सच्या अव्वल मानांकित लुकास माझूर याचा सामना करावा लागणार आहे. ''इतिहास घडण्याच्या तयारीत आहे. सुहास हे उत्तर प्रदेशातील नॉएडा येथी गौतम बुद्धनगर येथे जिल्हाधिकारी आहेत,''असे IAS असोसिएशनने ट्विट केले.