Tokyo Paralympics : वर्ल्ड रेकॉर्डसह सुमित अंतिलनं जिंकलं सुवर्ण,२४ तासांत भारतानं जिंकली ७ पदकं!

By ऑनलाइन लोकमत | Published: August 30, 2021 04:41 PM2021-08-30T16:41:47+5:302021-08-30T16:52:08+5:30

भारताचा भालाफेकपटू सुमित यानं पुरुषांच्या F64 भालाफेक गटात पहिल्याच प्रयत्नांत ६६.९५ मीटर लांब भालाफेक करून वर्ल्ड रिकॉर्ड नोंदवला.

TokyoParalympics, Men'sJavelin Throw: Sumit Antil wins gold (Sport Class F64) with World Record throw of 68.55m | Tokyo Paralympics : वर्ल्ड रेकॉर्डसह सुमित अंतिलनं जिंकलं सुवर्ण,२४ तासांत भारतानं जिंकली ७ पदकं!

Tokyo Paralympics : वर्ल्ड रेकॉर्डसह सुमित अंतिलनं जिंकलं सुवर्ण,२४ तासांत भारतानं जिंकली ७ पदकं!

Next

मागील २४ तासांतील भारताचे हे सातवे पदक,तर आजच्या दिवसातील पाचवे पदक ठरले.  नेमबाज अवनी लेखराच्या सुवर्णपदकानं आजच्या दिवसाची सुरुवात झाली. भारताचा भालाफेकपटू सुमित यानं पुरुषांच्या F64 भालाफेक गटात वर्ल्ड रेकॉर्डसह सुवर्णपदक जिंकले. भारताच्या संदीप एसला चौथ्या क्रमांकावर समाधान मानावे लागले. 

पहिल्याच प्रयत्नांत ६६.९५ मीटर लांब भालाफेक करून वर्ल्ड रेकॉर्ड नोंदवला. दुसऱ्या प्रयत्नात त्यानं आणखी लांब भाला फेकताना ६८.८ मीटर सह नवा वर्ल्ड रेकॉर्ड नावावर केला.  ( Sumit Antil throws another World Record of 68.08m in his second attempt in the Men's Javelin Throw F64 Final event). तिसऱ्या प्रयत्नात सुमितनं ६५.२७ मीटर भालाफेक केली, परंतु अन्य स्पर्धकांच्या तुलनेत त्यानं याही फेरीत चांगली कामगिरी करून दाखवली. त्यानं पाचव्या प्रयत्नात पुन्हा ६८.५५ मीटर लांब भालाफेकून पुन्हा स्वतःचाच वर्ल्ड रेकॉर्ड मोडला. या कामगिरीसह त्यानं सुवर्णपदकही नावावर केलं. ( Sumit Antil wins Gold Medal in the Men's Javelin Throw F64 event with a throw of 68.55m!) 

योगेश्वर दत्तला आदर्शस्थानी ठेवताना सुमितलाही कुस्तीपटू बनायचे होते. पण, २०१५मध्ये एका रस्ता अपघातात ट्रॅक्टर त्याच्या पायावरून गेला अन् त्याला एक पाय गमवावा लागला. द्रोणाचार्य पुरस्कार प्राप्त प्रशिक्षक नवल सिंग यांच्या सांगण्यावरून त्यानं भालाफेकीला सुरूवात केली. २०१८मध्ये त्यानं आशियाई अजिंक्यपद स्पर्धेत सहभाग घेतला, परंतु तेव्हा तो पाचव्या क्रमांकावर राहिला होता. त्यानंतर २०१९मध्ये जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत त्यानं रौप्यपदक जिंकून टोक्यो पॅरालिम्पिकची पात्रता निश्चित केली. 
 

मागील २४ तासांतील भारताचे हे सातवे पदक,तर आजच्या दिवसातील पाचवे पदक ठरले. ( India have won 7 medals in last 24 hours at #Tokyo2020 #Paralympics). नेमबाज अवनी लेखराच्या सुवर्णपदकानं आजच्या दिवसाची सुरुवात झाली.

 



टोक्यो पॅरालिम्पिकमध्ये (Tokyo Paralympics) भारतीय नेमबाज अवनी लेखरा (Avani Lekhra) ने सुवर्णपदकाचा वेध घेतला. यानंतर लगेचच थाळीफेकमध्ये योगेश कथुनियाकडून रौप्य, भालाफेक पटू देवेंद्र झाजरिया रौप्य, सुंदर सिंगकडून कांस्य पदक पटकावण्यात आले. अवनी लेखराने सुवर्णपदकाचा वेध घेतला. 10 मीटर एअर रायफलच्या क्सास एसएच १ मध्ये तिने हे पदक पटकावले आहे. 

Web Title: TokyoParalympics, Men'sJavelin Throw: Sumit Antil wins gold (Sport Class F64) with World Record throw of 68.55m

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.