व्हीआयटी भोपाळ-भविष्यासाठी सज्ज
By ऑनलाइन लोकमत | Published: March 2, 2020 04:00 AM2020-03-02T04:00:10+5:302020-03-02T04:00:18+5:30
शैक्षणिक क्षेत्रात अव्वल स्थानी असलेल्या व्हीआयटी भोपाल युनिव्हर्सिटीने उत्तर व मध्य भारतातील लोकांपर्यंत पोहोचणे,
भोपाल : शैक्षणिक क्षेत्रात अव्वल स्थानी असलेल्या व्हीआयटी भोपाल युनिव्हर्सिटीने उत्तर व मध्य भारतातील लोकांपर्यंत पोहोचणे, तसेच ज्ञानाची देवाण-घेवाण करण्याच्या उद्देशाने आमेर पॅलेस हॉटेलमध्ये २२ फेब्रुवारी रोजी ‘मंथन २०२०’ या विशेष उपक्रमाचे आयोजन केले होते.
यावेळी व्हीआयटी भोपाल युनिव्हर्सिटीच्या असिस्टंट व्हाइस प्रेसिडंट कादंबरी विश्वनाथन, युनिव्हर्सिटीचे कुलपती डॉ. पी. गुनासेकरन, रजिस्ट्रार के. के. नायर यांच्यासह डॉ. शिशिर शांडिल्य, डॉ. सौंदरराजन आदींनी विविध क्षेत्रांमधील रोजगारांच्या संधींविषयी माहिती दिली. युनिव्हर्सिटीमध्ये बायो इंजिनीअरिंग, एअरोस्पेस, सायबर सिक्युरिटी, गेमिंग टेक्नॉलॉजी, सायबरनेटिक्स, मशिन लर्निंग आदी क्षेत्रांत सुरू केलेल्या अभ्यासक्रमांची माहिती देण्यात आली. यावेळी विविध सत्रांमध्ये इतर शैक्षणिक संस्थांचे संचालक, शिक्षक, कोचिंग क्लासेसचे संचालक आदींनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला. (वा. प्र.)