पंतप्रधान मोदीजी 'जनता कर्फ्यू'त तुम्ही 5 वाजता काय केलं? ऑलिम्पिक पदक विजेत्या खेळाडूचा सवाल

By ऑनलाइन लोकमत | Published: March 23, 2020 11:03 AM2020-03-23T11:03:17+5:302020-03-23T11:04:51+5:30

कोरोना व्हायरसशी अहोरात्र संघर्ष करणाऱ्या डॉक्टर, नर्स आणि सफाई कामगारांचे देशवासियांनी आभार मानले...

What did you do at Janata Curfew at 5pm? Boxer vijender singh ask question to PM Narendra Modi svg | पंतप्रधान मोदीजी 'जनता कर्फ्यू'त तुम्ही 5 वाजता काय केलं? ऑलिम्पिक पदक विजेत्या खेळाडूचा सवाल

पंतप्रधान मोदीजी 'जनता कर्फ्यू'त तुम्ही 5 वाजता काय केलं? ऑलिम्पिक पदक विजेत्या खेळाडूचा सवाल

Next

कोरोना व्हायरसशी मुकाबला करण्यासाठी संपूर्ण देशभरात डॉक्टर्स, नर्स, सफाई कामगार अहोरात्र मेहनत घेत आहेत. त्यांचे आभार मानण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 22 मार्चला 'जनता कर्फ्यू' चं आवाहन केलं होतं आणि त्यांच्या या आवाहनाला भारतीयांनी मोठ्या संख्येन प्रतिसाद दिला. मोदींनी दनता कर्फ्यूत सायंकाळी 5 वाजता घराच्या खिडकीत येऊन लोकांना ताटं, शंख, घंटा वाजवून डॉक्टर्स व नर्सचे आभार मानण्याची विनंती केली होती.

त्यांच्या या विनंतीला मान राखून देशातील सेलिब्रेटींपासून ते सामान्य जनतेपर्यंत सर्वांना सायंकाळी पाच वाजता आपापल्या परीनं आभार व्यक्त केलं. प्रत्येकानं तशे व्हिडीओही सोशल मीडियावर अपलोड केले. पण, सायंकाळी 5 ते 5.05 या वेळेत मोदी तुम्ही आभार मानण्यासाठी काय केलं, असा सवाल ऑलिम्पिक पदक विजेत्या खेळाडूनं केला आहे.

2008च्या बिजिंग ऑलिम्पिक स्पर्धेत भारताला कांस्यपदक जिंकून देणाऱ्या बॉक्सर विजेंदर सिंगनं सोशल मीडियावरून मोदींना हा सवाल केला आहे. विजेंदरनं क्राँग्रेसच्या तिकीटावर दक्षिण दिल्लीतून लोकसभा निवडणूक लढली होती. त्यानं मोदींना विचारले की, ''सर नरेंद्र मोदीजी, कृपया आपण आपला व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करा. आम्हाला पण पाहायचे आहे की, तुम्ही पाच वाजता ताट वाजवली की आणखी काही... आपण माझा व्हिडीओ पाहू शकता.'' 


मोदींनी काय आवाहन केलं होतं ते पाहा...  

सेलिब्रेटींचा सहभाग...


अन्य महत्त्वाच्या बातम्या

इंग्लंडच्या जोफ्रा आर्चरची भविष्यवाणी खरी ठरली? सहा वर्षांपूर्वी केलेलं ट्विट व्हायरल

IPL 2020 चा अंतिम फैसला उद्या; 'या' पर्यायांपैकी एकाची होईल निवड

Coronavirus : लढा कोरोनाविरुद्धचा : ‘युवराज-कैफ यांच्यासारख्या निर्णायक भागीदारीची गरज’

Web Title: What did you do at Janata Curfew at 5pm? Boxer vijender singh ask question to PM Narendra Modi svg

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.