ऑनलाइन लोकमत
बंगळुरू, दि. १५ - मिताली राज(४२), वेलास्वामी वनिता(३८), हरमनप्रीत कौर(३९) व वेदा कृष्णस्वामी(३६) यांच्या दमदार खेळाच्या बळावर भारताने निर्धारीत २० षटकात ५ गड्यांच्या मोबदल्यात १६३ धावा केल्या. बांगलादेशसमोर विजयासाठी १६४ धावांचे आव्हान ठेवले आहे. बांगलादेशने नाणेफेकीचा कौल जिंकून भारताला प्रथम फलंदाजीस आंमत्रित केले होते. आजपासून महीला टी २० विश्वचषकास सुरवात झाली असुन सलामीचा सामना भारत आणि बांगलादेश दरम्यान चिन्नास्वामी स्टेडियम बंगळुरू येथे आहे.
कर्णधार मिताली राज आणि वेलास्वामी वनिताने ६२ धावांची धडाकेबाज दिली. या सलामीच्या जोडीने पहिल्या ६.३ षटकात १० च्या धावगतीने ६३ धावांची धडाकेबाज सलामी दिली. कर्णधार मिताली राजने ३५ चेंडून ५ चौकाराच्या मदतीने संयमी ४२ धावांची खेळी केली तर वेलास्वामी वनिताने २४ चेंडूत ७ चौकारांच्या मदतीने झटपट ३८ धावांची खेळी केली.
भारत मजबूत स्थितीत असतानाच भारताला सलग दोन झटके बसले वेलास्वामी वनितानंतर मंदना खातेही न उघडता बाद झाल्याने भारताची धावगती मंदावली. अनुभवी मिताली राजने कौर सोबत डावाला आकार देण्याचा प्रयत्न केला. हरमनप्रीत कौरने आक्रमक फंलदाजी करताना २९ चेंडूत ३ षटकार आणि ३ चौकारांच्या मदतीने झटपट ३९ धावा केल्या. शेवटच्या हाणामारीच्या षटकात वेदा कृष्णस्वामीने २४ चेंडूत २ षटकाराच्या मदतीने ३६ धावा केल्या. बांगलादेश तर्फे रुमाना अहमद आणि फाहिमा खातूनने भारताच्या दोन फलंदानां बाद केले. तर नाहिदा अख्तरने एका भारतीय फलंदाजाला तंबूचा रास्ता दाखवला.