विश्वचषक नेमबाजी: युवा नेमबाजांकडून ‘डबल गोल्ड’ धमाका
By ऑनलाइन लोकमत | Published: April 26, 2019 02:57 AM2019-04-26T02:57:57+5:302019-04-26T02:58:16+5:30
मनू- सौरभ, दिव्यांश- अंजुम यांचा सुवर्ण वेध
बीजिंग : भारताच्या युवा नेमबाजांनी आयएसएसएफ विश्वचषकात गुरुवारी मिश्र प्रकारातील दोन्ही सुवर्ण पदके जिंकून स्पर्धेच्या तिसऱ्या दिवशी वर्चस्व गाजविले. मनू भाकर- सौरभ चौधरी यांनी दहा मीटर एअर पिस्तुल प्रकारात सुवर्ण पदक जिंकल्यानंतर दिव्यांशसिंग पनवार याने अनुभवी अंजुम मोदगिल हिच्या सोबतीने दहा मीटर एअर रायफल प्रकारात आणखी एक सुवर्ण जिंकून पदक तालिकेत देशाला अव्वल स्थान मिळवून दिले.
तिसºया दिवसाच्या खेळाची सुरुवात नवी जोडी, नवा प्रकार आणि नव्या निकालाने झाली. केवळ दुसरी वरिष्ठ स्पर्धा खेळत असलेल्या दिव्यांशने अनुभवी मोदगिलच्या सोबतीने दहा मीटर एअर रायफल फायनलमध्ये लियू रूचसुआन- यांग हाओरन या चीनच्या जोडीला १७-१५ असे मागे टाकून सुवर्ण जिंकून दिले. आंतरराष्टÑीय नेमबाजी महासंघाने बीजिंग स्पर्धेपासून मिश्र प्रकारात खेळाचे नवे सूत्र लागू केल्यामुळे भारतीय जोडीचे हे यश विशेष असे आहे. मोदगिल- पवार यांनी ५२२.७ गुणांसह सहावे स्थान घेत अंतिम फेरीची पात्रता गाठली होती.
सुवर्ण पदकाच्या लढतीत भारतीय जोडी एकवेळ ११-१३ ने मागे होती. नंतर मुसंडी मारुन सुवर्णावर नाव कोरले. अपूर्वी चंदेला- दीपक कुमार या अन्य भारतीय जोडीने पात्रता फेरीत ५२२.८ गुण घेत पाचवे स्थान पटकविले. फायनलमध्ये दोघेही माघारताच ही जोडी सहाव्या स्थानी राहिली. मनू- सौरभ यांनी दहा मीटर एअर पिस्तुल अंतिम लढतीत चीनचे जियांग रँक्सिन- पांग पेई यांचा १६-६ असा पराभव केला. भारतीय जोडीने ४८२ गुण घेत पाचव्या स्थानासह अंतिम फेरी गाठली. मनू- सौरभ यांचे दहा मीटर एअर पिस्तुल प्रकारातील हे दुसरे सुवर्ण ठरले.
दोघांनी नवी दिल्लीत फेब्रुवारीत आयएसएसएफ विश्व चषकात सुवर्ण जिंकले होते. मनू बुधवारी दहा मीटर एअर पिस्तुल प्रकारात अपात्र ठरली होती. दहा मीटर एअर पिस्तुल मिश्र प्रकारात हीना सिद्धू- रिझवी शहजार ही भारतीय जोडी ४७९ गुणांसह पात्रता फेरीत १२ व्या स्थानावर राहील्याने अंतिम फेरी गाठू शकली नाही. नव्या प्रकारात अव्वल ८ संघ फायनलसाठी पात्र ठरतात. २२पुरुषांच्या २५ मीटर एअर पिस्तुल प्रकारात पात्रता फेरीत आदर्शसिंग २९० गुणांसह १५ व्या, अनिश भानवाला २८९ गुणांसह १७ व्या आणि अर्पित गोयल
२८८ गुणांसह २२ व्या स्थानी राहिला. या प्रकारात एकूण ५७ नेमबाज सहभागी झाले आहेत.