झिम्बाब्वे, अफगाणिस्तानचे मुख्य फेरी गाठण्याचे लक्ष्य

By admin | Published: March 10, 2016 03:26 AM2016-03-10T03:26:25+5:302016-03-10T03:26:25+5:30

आयसीसी टी-२० विश्वचषक पात्रता फेरीत ‘ब’ गटात सलामी लढत जिंकणारे झिम्बाब्वे आणि अफगाणिस्तान संघ गुरुवारी दुसऱ्या विजयांसह मुख्य फेरीत धडक देण्याच्या इराद्याने उतरणार आहेत

Zimbabwe, Afghanistan aim to reach the main round | झिम्बाब्वे, अफगाणिस्तानचे मुख्य फेरी गाठण्याचे लक्ष्य

झिम्बाब्वे, अफगाणिस्तानचे मुख्य फेरी गाठण्याचे लक्ष्य

Next

किशोर बागडे / जयंत कुलकर्णी, नागपूर
आयसीसी टी-२० विश्वचषक पात्रता फेरीत ‘ब’ गटात सलामी लढत जिंकणारे झिम्बाब्वे आणि अफगाणिस्तान संघ गुरुवारी दुसऱ्या विजयांसह मुख्य फेरीत धडक देण्याच्या इराद्याने उतरणार आहेत.दुसरीकडे हाँगकाँग व स्कॉटलंड संघासाठी दुसरी लढत ‘करा किंवा मरा’ अशीच असेल. विदर्भ क्रिकेट संघटनेच्या जामठा स्टेडियममध्ये हे दोन्ही सामने दुपारी ३ आणि सायंकाळी ७.३० वाजेपासून रंगतील.
मंगळवारी तुलनेत बलाढ्य मानल्या जाणाऱ्या झिम्बाब्वेला हाँगकाँगने झुंजविल्याने केवळ १४ धावांनी विजय मिळविता आला. अफगाणिस्तान संघदेखील स्कॉटलंडविरुद्ध काठावर पास झाला नाही. दोन सामने जिंकणारे
२ संघ मुख्य फेरीत जाणार असून पराभूत संघ बाहेर पडणार आहेत. त्यामुळे हाँगकाँग आणि स्कॉटलंड यांच्यासाठी आजचे सामने महत्त्वाचे असतील. हाँगकाँग आणि स्कॉटलंड संघात युवा खेळाडूंचा भरणा आहे पण अनुभवात हे संघ कमी पडतात. टी-२० मध्ये कुठे आणि कधी फलंदाजी- गोलंदाजीत कमाल करायची हे त्यांना
अद्याप अवगत झाले नसल्याचे कालच्या सामन्यादरम्यान प्रकर्षाने जाणवले. झिम्बाब्वे संघ समतोल वाटतो पण त्यांनाही क्षेत्ररक्षणात सुधारणा करण्यास वाव आहे. मोक्याच्या क्षणी झेल सोडणे आम्हाला महागडे ठरू शकले असते पण थोडक्यात बचावलो, अशी प्रतिक्रिया वुसी सिबांडा याने दिली होती. सलामी लढतीत अर्धशतक करणारा अफगाणिस्तानच्या मोहम्मद शहजाद, कर्णधार असगर स्तानिकजई यांना अन्य सहकाऱ्यांकडून आज मोठ्या कामगिरीची अपेक्षा बाळगावी लागेल. क्रिकेट बेभरवशाचा खेळ आहे. कुठला संघ संधीचे सोने करण्यात यशस्वी होतो, हे उद्याच पहायला मिळेल.

Web Title: Zimbabwe, Afghanistan aim to reach the main round

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.