शेअरिंगवाली मोठ्ठी छत्री
By Admin | Published: January 7, 2016 09:42 PM2016-01-07T21:42:34+5:302016-01-07T21:42:34+5:30
तरणा अकरा वर्षाचा आहे, दुसरीत शिकतो. शाळेत जाताना दर पावसाळ्यात खूप भिजतो कारण त्याच्या गावात पाऊस फार. एका छत्रीत दोघं गेले
>- तरणा जॉय
इयत्ता दुसरी, ढलाई, त्रिपुरा
तरणा अकरा वर्षाचा आहे, दुसरीत शिकतो. शाळेत जाताना दर पावसाळ्यात खूप भिजतो कारण त्याच्या गावात पाऊस फार. एका छत्रीत दोघं गेले तर दिवसभर ओल्या कपडय़ानं शाळेत बसावं लागतं.
त्यातून तरणाला या मोठय़ा छत्रीची कल्पना सुचली. या मोठय़ा छत्रीत चारपाच जण जाऊ शकतात. शिवाय एकजण दांडा मधे धरेल व दोन्ही बाजूनं दोन मुलं धरतील अशी निमुळती आयताकृती ही छत्री असेल.
तरणा म्हणतो, ‘माङयासह आम्ही पाच भाऊ, तीन बहिणी. सगळ्यांनी पावसाळ्यात एकदम बाहेर जायचं तर असं काहीतरी मोठं हवंच, म्हणून मी ही छी बनवली.’