- लीना खांडेकर
मेकअप लग्नाला जाताना किंवा काहीतरी स्पेशल ओकेजन असेल तरच करतात असा अनेकजणींचा समज असतो! त्यात रोजरोज मेकअप करायचा म्हणजे सिरियलवाल्यां इतका असाही एक गैरसमज! पण खरंतर रोज प्रेझेण्टेबल दिसणं ही आता कामाची गरज आहे. अगदीच बेंगरुळ दिसणं वाईट, टापटीप दिसायलाच हवं! त्यासाठी काय करता येईल?
१) बाजारात छान फाउंडेशन कॉम्पॅक्ट मिळतात याचा वापर करा जेणे करून चेहर्यावर जर काही डाग असतील, पॅच असतील तर कमी दिसतील.
२) त्यावर आपल्या आवडीची लिपस्टिक लावावी. साधारत: दिवसा पिंकपेच, हलका ब्राउन कलर अशी लावावी. ओठांना भेगा असल्यास आधी लिपबाम लाऊन ठेवावा. मग लिपस्टिक लावावी व गरज भासल्यास ट्रान्सपरण्ट लिपग्लासचा वापर करावा.
३) रामॉसी, आईन्सी तसेच मॅट आणि मिनरल बेस पावडर, फाउंडेशनचा वापर तुम्ही करू शकता. ४) एखादी काजळाची रेघ हवीच. ते वॉटरप्रूफ लावा. काजळही वापरताना जेम्स वेस अथवा केक वेस लायनरचा वापर करू शकता.
५) हे एवढं केलं तरी चेहरा चांगला दिसेल. तुमचा कॉण्फिडन्स वाढेल. आपण चांगले दिसतोय असं वाटलं तर चारचौघांत बोलण्याचाही ऑकवर्डनेस कमी होतो.