प्रज्ञा शिदोरे
भारताची राज्यघटना. प्रत्येक नागरिकाने वाचलंच पाहिजे आणि समजून घेतलं पाहिजे असं हे पुस्तक. घटना हा आपल्या देशातल्या सर्व कायद्यांचा पाया आहे. म्हणूनच कायदा पाळू इच्छिणाºया सर्वांनाच ही घटना कशी आहे, यामध्ये काय गोष्टी आहेत, याचं भान असणं आवश्यक आहे.२ वर्ष ११ महिने आणि १८ दिवसांच्या अथक प्रयत्नांनंतर आणि अर्थातच अनेक विषयांवरच्या घमासान चर्चेनंतर ही घटना आकारास आली. भारताचं संविधान हे जगातलं सर्वात मोठं लिखित संविधान आहे.आपण राष्टÑप्रेमाविषयी बोलतो; पण आपण ही राज्यघटना वाचलेली, पाहिलेली तरी असते का?ती मिळवून वाचायला तर हवीच.पण पाहून समजून घ्यायचं असेल तर ‘राज्यसभा’ नावाचं एक फॅण्टॅस्टिक चॅनेल आहे. त्या चॅनेलवर राज्यसभेमधली भाषणं आपल्याला थेट बघता येतात. नुकतंच त्यांनी त्यांचं यू ट्यूब चॅनेलही सुरू केलं आहे. ‘राज्यसभा टीव्ही’ या नावानं. या यू ट्यूब चॅनेलवर आपली ही राज्यघटना कशी तयार झाली, यामध्ये कोणत्या गोष्टींचा आणि का समावेश झाला, अशा सर्व गोष्टींची मांडणी केली गेली आहे. ही १० एपिसोड्सची सिरीज आपल्याला स्वातंत्र्यानंतरच्या भारताच्या इतिहासाचं दर्शन घडवून आणते. तेव्हा ही वेबसिरीजही पहायला अजिबात विसरू नका. नाव आहे ‘Samvidhaan’.यामधला जसा इतिहास तुम्हाला बघायला आवडेल तशीच अतिशय शुद्ध हिंदी भाषाही ऐकायचा आनंद तुम्हाला मिळेल.rajya sabha samvidhan असा गूगल किंवा यू ट्यूबला सर्च मारा, १ ते १० भाग पाहा.