शहरं
Join us  
Trending Stories
1
एक्झिट पोल पुन्हा ठरले फोल! महायुतीला कौल दिला, पण ‘त्सुनामी’चा अंदाज नाही आला!
2
Maharashtra Assembly Election Result 2024: एकनाथ शिंदेंनी 'करून दाखवलं', विधानसभेत जे बोलले होते, तसंच झालं! उद्धव ठाकरेंना जबर धक्का
3
नैसर्गिक युती तोडल्याचा जनतेच्या मनात राग, महायुतीच्या निकालानंतर विनोद तावडेंचा उद्धव ठाकरेंवर निशाणा!
4
मोठी बातमी...! नागपूर दक्षिण-पश्चिममध्ये देवेंद्र फडणवीस यांचा दणदणीत विजय; होणार मुख्यमंत्री?
5
बारामतीची जनता हुशार; एका वाक्यात सुनेत्रा पवारांनी केले विरोधकांना गपगार...
6
मविआचे पानिपत...! महायुतीच्या मुसंडीची ही दहा जोरदार कारणे; ठाकरे, पवारांची सहानुभूती ओसरली...
7
Ramtek Vidhan Sabha Election Result 2024: ठाकरेंच्या शिवसेनेला रामटेकमध्ये जबर हादरा!
8
Badnera Assembly Election 2024 Result Live Updates: "आमच्या रामाचं बाण मतदारांनी चालवून दाखवलं, देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होणार"
9
Kopri Pachpakhadi Vidhan Sabha Election Result 2024 Live: एकनाथ शिंदेच आनंद दिघेंचे खरे वारसदार! पुतण्या केदार दिघेंना किती मतं पडली, पाहा आकडे
10
कोकणात महायुतीची जोरदार मुसंडी, तब्बल ३३ जागांवर आघाडी, ठाकरेंना मोठा धक्का
11
हाय व्होल्टेज ड्रामा, ते अपक्ष उमेदवारी; शेट्टीचं तिकीट कापलेल्या मतदारसंघात संजय उपाध्यायांची सरशी
12
मराठवाड्यासह महाराष्ट्रात जरांगे फॅक्टर फेल, मतदारांचा महायुतीला भक्कम पाठिंबा...
13
Maharashtra Assembly Election Result 2024: पुन्हा निवडणूक घ्या, हा निकाल जनमताचा कौल नाही, नाही, नाही; संजय राऊत संतापले 
14
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Live: अनेक मतदारसंघांमध्ये उलथापालथ; या क्षणाला कोणी घेतली आघाडी? सर्व अपडेट्स
15
Maharashtra Assembly Election Result 2024:  शिंदेंच्या शिवसेनेची घौडदौड! श्रीकांत शिंदे म्हणाले, "१८-२० तास काम करणारे मुख्यमंत्री..."
16
Maharashtra Assembly Election 2024 Results Highlights : "ज्यांच्या जास्त जागा त्यांचा मुख्यमंत्री असं ठरलेलं नाही"; शिंदेंनी मानले लाडक्या बहिणींचे आभार
17
Maharashtra Election Result: "देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होतील", भाजपच्या नेत्याचं मोठं विधान
18
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: खेळ खल्लास! विधानसभेत ‘विरोधी पक्षनेता’ बसवणंही कठीण; ठाकरे, पवार गट, काँग्रेसवर नामुष्की?
19
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights : "'गिरे तो भी तंगडी ऊपर', अशी राऊतांची स्थिती"! शिवसेना शिंदे गटाचा टोला
20
शोभिता धुलिपालासोबत नवीन प्रवास सुरू करण्यासाठी नागा चैतन्य उत्सुक, म्हणाला- "कमतरतेला ती..."

CYCLE

By admin | Published: January 29, 2016 1:32 PM

सायकल म्हणजे गरिबाची सोबतीण ही कल्पनाच मागे पडली आणि ज्यांना लाखांच्या गाडय़ा घेणं परवडू शकेल असे तरुण दोस्त आता सायकलवेडे होत गिअरवाल्या सायकलींसाठी जिवाचं रान करताहेत. मात्र हौस म्हणून, सायकल रेसमध्ये बाजी मारायची म्हणून, सायकलवरून देश पाहायला निघायचं म्हणून किंवा केवळ स्टाइल मारायची म्हणून गिअरवाली महागडी सायकल घेताना गणित चुकलं तर?

 सायकल म्हणजे गरिबाची सोबतीण ही कल्पनाच मागे पडली आणि ज्यांना लाखांच्या गाडय़ा घेणं परवडू शकेल असे तरुण दोस्त आता सायकलवेडे होत गिअरवाल्या सायकलींसाठी जिवाचं रान करताहेत. मात्र हौस म्हणून, सायकल रेसमध्ये बाजी मारायची म्हणून, सायकलवरून देश पाहायला निघायचं म्हणून किंवा केवळ स्टाइल मारायची म्हणून गिअरवाली महागडी सायकल घेताना

गणित चुकलं तर? ते चुकू नये आणि सायकलिंगचा मस्त आनंद लुटता यावा म्हणून माहिती असावी
अशी ही सायकलची एबीसीडी ! 
 
‘गिअर अप’ म्हणत तरुण जगण्याचा भाग झालेला  एक ‘पायडल मारो’ सुसाट ट्रेण्ड
 
सायकल कधी चालवलीत आपण?
कोणती सायकल होती ती?
किती किमतीची?
त्यात काय काय सुविधा होत्या?
किती इंच उंचीची?.
किती गिअरची?
ही सायकल तुम्ही कुठे (कुठे) दामटायचात?
डांबरी रस्त्यावर?
ग्रामीण भागातल्या ओबडधोबड, धुळवडीच्या रस्त्यांवर?
की चालवताना पाच मिनिटांत पार घामटा निघेल आणि पायडलवर उभं राहिलं तरी एक मिलिमीटरही सायकल पुढे सरकणार नाही अशा थोराड चढाच्या टेकाडी रस्त्यांवर?.
आता सायकल ती सायकल.
त्यात विशेष असं काय असणार? (असंच आपल्याला वाटत असणार!)
सायकल घ्यायची आणि करायची दामटायला सुरुवात.
रस्ता डांबरी असो, खडकाळ, रेताड नाहीतर डोंगरउताराच्या घाटांचा.
सायकलची उंचीही एकच. 22 नाहीतर 24 इंची.
चालवणारं पोरगं उंचीनं बटुकबैंगन असेल तर लंगडी घालत सायकल चालवायची, उंची थोडी वाढली की सिटवर बसून टंगळत्या पायांनी एक एक पायडल जोरात ढकलून चालवायची. अचानक गर्दीत र्अजट ब्रेक दाबावा लागला तर ब्रेक दाबता दाबताच सायकलवरून खाली उडी मारून स्टंट करत स्वत:ला वाचवायचं. आणि उंची पुरेशी वाढली की मग आरामात सायकलवर बसून वाटेल तिथे फिरायचं!
पूर्वी हाच होता ना सगळ्यांचा फंडा?.
सायकलींची किंमतही फार नाही, पूर्वी हजार-दोन हजारात मिळायची, आता चार-पाच हजारात मिळत असेल असाही आपला समज.
पण हे सगळंच आता बदलतं आहे.
**
सायकलनं अनेकांचं आयुष्य समृद्ध केलं आहे. सायकलला पूर्वी जी प्रतिष्ठा होती, जो सन्मान होता, तो कालांतरानं गेला; पण सायकलविषयीची आसक्ती मात्र संपली नाही. आजही नाही.
सायकलची गेलेली प्रतिष्ठा सुदैवानं आज परत येताना दिसतेय. अनेक शहरांमध्ये, विशेषत: तरुणांमध्ये सायकलीचं वेड पसरताना दिसतंय. गर्भश्रीमंत लोकही याला अपवाद नाहीत. आलिशान चारचाकी गाडय़ांवरून सायकलकडे वळणारी, वळालेली लोकंही थोडीथोडकी नाहीत. सायकलींवर प्रेम करणारी ही मंडळी, एकवेळ आपली कार दुस:याला चालवायला देतील, पण एखाद्या ‘अनाडी’च्या हाती थोडा वेळ का होईना, सायकल देतानाही चार वेळा विचार करतील. 
याची मुख्य कारणं दोन. सायकलींच्या तंत्रज्ञानात झालेली आमूलाग्र क्रांती आणि गाडय़ांनी उडवलेल्या धुराडय़ामुळे सर्वसामान्यांचं धोक्यात आलेलं आयुष्य.
आरोग्याच्या दृष्टिकोनातूनही सायकलचं महत्त्व असाधारण.
एकतर कोणत्याही वयाची, कोणत्याही सामाजिक, आर्थिक गटातली व्यक्ती सायकल चालवू शकते. शिवाय इतर कोणत्याही खेळ, व्यायामापेक्षा सायकलीतून होणारे फायदे तुलनेनं जास्त आणि धोके कमी. कुठल्याही मोठय़ा शहरात जा, चारचाकी गाडय़ांवरून सायकलींकडे वळालेली अनेक मंडळी दिसतील. रस्त्यांवर चारचाकींच्या बरोबरीनं सायकल चालवणारी मंडळी आणि त्यांच्याकडे मोठय़ा कुतूहलानं पाहणारे लोकंही हमखास दिसतील.
सर्वसामान्यांच्या आयुष्यात सायकललनं परत केलेला शिरकाव आणि तिला मिळत असलेली प्रतिष्ठा ही चांगलीच गोष्ट आहे. इतर पुढारलेल्या पाश्चात्त्य देशांच्या तुलनेत हे पुनरुज्जीवन थोडं उशिराच आलं हेही खरं. पण सायकलींचं वेड निदान शहरी भागात तरी फार मोठय़ा प्रमाणात वाढतंय, हेही तितकंच खरं.
मात्र ‘घेतली सायकल आणि केली दामटायला सुरुवात’ हा फंडा मात्र आता चालणार नाही. कारण यात अनेक गोष्टी आहेत आणि त्या समजून घेतल्याच पाहिजेत. आपलं वय, वापर आणि हेतूनुसार योग्य सायकल घेतली, तर सायकल आयुष्यभर आपल्या हातून सुटणार नाही हे नक्की.
मात्र आखुडशिंगी आणि बहुदुधी सायकल निवडायची कशी, हाच अनेकांसमोर यक्षप्रश्न असतो. आज सायकलींच्या दुकानात गेलं तर पाच हजारांपासून तर पन्नास हजारांर्पयत (अगदी लाखालाखाच्या आणि कारपेक्षाही जास्त किमतीच्या) सायकली उपलब्ध आहेत. इतक्या सायकली आणि तिचे इतके प्रकार. कोणती निवडायची याचा गोंधळ होतोच. काही जण फार विचार न करता, सरळ दिसायला टकाटक असणारी सायकल निवडून मोकळे होतात, तर काही जण हा गोंधळ निस्तरता न आल्यानं ‘जाऊ द्या ही झंझट, बघू नंतर’ म्हणून त्यापासून जे लांब जातात, ते पुन्हा सायकलच्या वाटय़ालाच जात नाहीत.
यासाठी सायकल कोणती निवडायची हा सर्वात कळीचा मुद्दा. ती निवडली की मग पुढचं सगळं सुरळीत होतं. पण आपल्या सोयीची सायकल निवडताना कुठलीही घाईगर्दी आणि दुस:याचं बघून आपणही तीच सायकल निवडण्याच्या फंदात पडू नये हेच खरं. 
 
 
कोणती सायकल घेऊ?
सायकल खरेदी करण्यापूर्वी प्रत्येकानं स्वत:ला काही प्रश्न जरूर विचारावेत. त्या प्रश्नांची उत्तरं मिळाली, की आपल्या मनातला गोंधळही आपोआपच मिटेल आणि योग्य सायकल घेण्याच्या दृष्टीनं आपलं पहिलं पाऊल पडेल.
सायकल मला कशासाठी हवी आहे, ती मी कुठे चालवणार आहे आणि किती चालवणार आहे?. या बेसिक प्रश्नांची उत्तरं स्वत:कडूनच घेतली की, आपल्या मनातला निम्म्यापेक्षा जास्त गोंधळ कमी होईल.
सायकलींचे मुख्यत: तीन प्रकार.
रोड बाईक, माऊंटन बाईक आणि हायब्रीड बाईक.
रोड बाईक- या सायकलचे टायर अतिशय बारीक असतात, या सायकलचं हॅँडल खाली झुकलेलं असतं आणि मुख्यत्त्वे डांबरी, चांगल्या रस्त्यांवरून आणि लांब पल्ल्याच्या अंतरासाठी ही सायकल वापरली जाते.
माऊंटन बाईक - या सायकलला ‘एमटीबी’ असंही म्हटलं जातं. या सायकलचे टायर अतिशय रुंद असतात आणि मुख्यत्त्वे खडबडीत, मातीच्या, डोंगरउतारांच्या रस्त्यावर, ‘ऑफरोड’ चालवण्यासाठी ही सायकल उत्तम असते. मात्र टायर जाड असल्यानं ही सायकल चालवण्यासाठी जास्त एनर्जीचीही आवश्यकता असते.
हायब्रीड बाईक- रोडबाईक आणि एमटीबी यांच्या मधला प्रकार म्हणजे हायब्रीड. या सायकलचे टायर रोडबाईकपेक्षा रुंद, पण एमटीबीपेक्षा अरुंद असतात. डांबरी रस्त्याबरोबरच थोडय़ाफार खडबडीत रस्त्यांसाठी ही सायकल उत्तम. यात पुन्हा दोन प्रकार. विथ सस्पेन्शन आणि विदाऊट सस्पेन्शन. सायकलिंग जर ‘ऑफ रोड’ असेल तर सस्पेन्शन असायला हवं आणि डांबरी, चांगल्या रस्त्यांवरुन सायकलिंग होणार असेल तर मग सस्पेन्शनची गरज नाही.
यात आपण कुठल्या प्रकारांत बसतो, त्यानुसार सायकलची निवड करावी. 
 
किती गिअरची सायकल?
आजकाल सिंगल गिअरपासून ते 24 आणि त्यापुढेही अनेक गिअर्सच्या सायकली मिळतात.
सिंगल गिअरच्या सायकली थोडय़ा अंतरासाठी आणि सपाट डांबरी रस्त्यांसाठी वापरता येतात; पण आपल्याला सायकल पुढेही हौशीनं चालवायची असेल तर गिअरची, त्यातल्या त्यात 21 गिअरची (पुढे तीन, मागे सात. त्याचे कॉम्बिनेशन मिळून 21 गिअर) सायकल वापरायला हरकत नाही. 
गिअरच्या सायकलींचा फायदा हा की, अगदी चढाच्या रस्त्यांवरही आपण कमी श्रमात सायकल चालवू शकतो. त्यामुळे कारणं सांगून सायकलपासून पळ काढण्याचं प्रमाण कमी होतं.
पारंपरिक सायकलींपेक्षा अशा सायकली थोडय़ा महाग असल्या तरी शेवटी त्या फायदेशीर ठरतात. आपल्या बजेटनुसार दहा हजाराच्या पुढे चांगल्या सायकली मिळू शकतात. कमी किमतीतली सायकल घेऊन नंतर अडगळीत पडण्यापेक्षा, थोडं थांबून, पण चांगली, आपल्याला सर्वार्थानं योग्य अशी सायकल घेतली तर तो नक्कीच फायदे का सौदा असेल.
 
 
सायकलिंग ग्रुप्स.
सध्या अनेक शहरांमध्ये सायकलिंग ग्रुप्स तयार झाले आहेत. अर्थातच यातले सारेच सहभागी कोणीही जबरदस्ती न करता स्वत:हून यात सहभागी झाले आहेत. मुंबई, पुणो, नाशिक. अनेक शहरांतले हे ग्रुप्स सायकल चळवळ जोमानं पुढे नेताहेत. सायकलिंगला सुरुवात केल्यानंतर आपल्यालाही या ग्रुप्सना जोडून घेता येतं. या ग्रुप्सच्या माध्यमातून सायकल पिकनिकपासून तर सायकलिंग वर्कशॉपर्पयत अनेक उपक्रम राबविले जातात. एकटय़ानं कुठे जाण्यापेक्षा ग्रुपसोबत सायकलिंगची मजा औरच. सायकलिंगची कमिटमेण्ट वाढण्यात या ग्रुप्सचा खूप मोठा हात आहे. या ग्रुप्सशी स्वत:ला जोडून घेणंही तसं अगदीच सोपं. आपण ज्या शहरात राहतो, तिथले बहुतांश ग्रुप फेसबुकवरही अॅक्टिव्ह आहेत. एकदा का सायकल चालवायला सुरुवात केली की सायकलिंगची मंडळी रस्त्यावर दिसतातच. त्यांच्याशी संपर्क साधूनही या ग्रुप्सशी आपल्याला जोडून घेता येतं. काही शहरांत तर अगदी एरियानुसार हे ग्रुप्स आहेत. आपल्या भागातल्या आणि आपल्या आवडीच्या, पसंतीच्या ग्रुपशी जोडून घेण्याचाही पर्याय आहेच. खरं तर एकदा सायकल चालवायला सुरुवात केली, की आपल्याला हवी असणारी सारी दारं ‘खुल जा सिमसिम’ म्हणत आपोआपच आपल्यासाठी खुली होतात. फेसबुकवर शोधलं तरी असे अनेक ग्रुप्स सापडतील.
 
गिअर कसे वापरायचे?
गिअरची सायकल म्हटल्यावर ती कशी चालवायची म्हणून अनेकांना धसका बसतो. पण त्याचं तंत्र समजून घेतलं तर अगदी थोडय़ाशा सरावानंतरही ही सायकल आपण सहज चालवू शकतो. त्यानंतरच पारंपरिक सायकल आणि गिअरच्या सायकलींची मजा आपल्याला कळू शकते.
यातलं महत्त्वाचं वैशिष्टय़ म्हणजे पार वाकडंतिकडं होऊन, असेल-नसेल तेवढा जोर लावत, घामाच्या धारा काढत सायकल चालवण्यात काहीच हशील नाही. सायकलिंगमुळे व्यायाम तर झालाच पाहिजे, पण सायकलिंगची गंमतही हरवता कामा नये.
नव्याने सायकल चालवणा:या आणि हौशी सायकलपटूंसाठी लक्षात ठेवण्यासारखी गोष्ट म्हणजे सायकलिंग हळूहळू वाढवत नेणो. त्यातही तुम्ही सायकल किती जोरात दामटता यापेक्षा एका मिनिटात तुम्ही किती वेळा पायडल मारता (आरपीएम- रिव्होल्यूशन्स पर मिनिट) हे जास्त महत्त्वाचं. 
एण्ट्री लेवलला ‘लो गिअर अॅण्ड मोअर आरपीएम’ हे सूत्र. कमी गिअरला तुम्ही सायकल चालवली तर तुम्हाला वेग कमी मिळेल, पण तुमचे श्रम कमीत कमी होतील. सर्वसाधारणपणो नव्यानेच सायकल चालवणा:यांनी आपला आरपीएम 8क् ते 85 ठेवावा. (मिनिटाला 8क् ते 85 पायडल). 
आता ‘आरपीएम’ वगैरे ऐकल्यावर हबकून जाण्याचं कारण नाही. सायकलींसाठी आजकाल अनेक प्रकारच्या अॅक्सेसरीज मिळतात, त्यातलं एक आहे ‘सायकल कम्प्युटर’ नावाचं एक लहानसं यंत्र. ते सायकलला जोडलं की त्यावर सगळा डाटा येतो. आत्ता किती वाजले आहेत इथपासून ते तुम्ही किती वेगानं सायकल चालवताहात, तुमचा मॅक्स आणि लोएस्ट स्पीड काय होता, आज आणि आत्तार्पयत तुम्ही किती किलोमीटर सायकल चालवलीत, तुमच्या सायकलचा आरपीएम वगैरे वगैरे. हे यंत्र फार महाग नाही, पण आपल्या स्मार्टफोनच्या मोबाइल अॅप्सवरूनदेखील ही सारी माहिती आपल्याला मिळू शकते. या माहितीमुळे सायकलमधली रंजकता वाढते इतकंच. अर्थात या गोष्टी नसल्या तरी काही बिघडत नाही. 
 
कराच/करू नका.
* सायकलिंग असू द्या किंवा कोणताही स्पोर्ट्स. आपली सुरक्षा सर्वाधिक महत्त्वाची. ‘सर सलामत तो पगडी पचास’. त्यामुळे हेल्मेट मस्ट. एवढी महागडी सायकल घेतली, हेल्मेटचं बघू नंतर म्हणून त्याकडे दुर्लक्ष करू नका. खास सायकलिंगची, वजनाला अत्यंत हलकी अशी हेल्मेट्स बाजारात मिळतात. थोडे पैसे गेले तरी हरकत नाही, पण हेल्मेट इज मस्ट.
* सायकलच्या संदर्भात पॅडल, सॅडल आणि हॅँडल या तीन गोष्टींकडे जर लक्ष दिलं तर तुमचा सायकल एक्सपिरिअन्स तुमच्या अनुभवाला चार चांद लावून जाईल. सायकलिंग करताना आपला पाय आणि पॅडल यातला कोन योग्य राखणं, सॅडल (सिट) आपल्या उंचीनुसार योग्य ठिकाणी अॅडजस्ट करणं आणि सायकलचं हॅँडल आपल्याला सूट होईल अशा त:हेनं ठेवणं. या तीन गोष्टी जर व्यवस्थित असल्या तर सायकलिंगचे फायदेच फायदे.
* सायकल निवडतानाही आपल्या बॉडी अॅनॉटॉमीला जी सायकल सूट होते ती निवडली पाहिजे. अगोदर सायकल निवडून नंतर त्यानुसार आपली बॉडी अॅडजस्ट करणं म्हणजे खाली डोकं वर पाय करून हातावर चालण्यासारखं आहे. 
* हाय गिअरवर जास्त वेळ सायकल चालवू नका. त्यामुळे आपल्या गुडघ्यांवर प्रेशर येऊ शकतं. 
*लॉँग डिस्टन्स रायडिंगसाठी जाताना आपल्या सोबत पाणी, इलेक्ट्रॉलसारख्या गोष्टी असल्याच पाहिजेत, जेणोकरून डिहायड्रेशनचा धोका टाळता येईल.
* स्ट्रेचिंग अत्यावश्यक. पण यासंदर्भातही मतभेद आहेत. काही जण सायकलिंग, व्यायाम सुरू करण्याच्या आधीही स्ट्रेचिंग करायला सांगतात. पण माङया अभ्यासानुसार आफ्टर सायकलिंग स्ट्रेचिंग करणं जास्त आवश्यक आहे. त्यावेळी तुमचे मसल्स वॉर्म झालेले असतात. कोल्ड मसल्स असताना जास्त स्ट्रेचिंग केलं तर इन्ज्युरी होऊ शकते. 
* सायकलिंग करतानाही सायकलिंग एकदम थांबवू नये. सायकलिंगचा वेग हळूहळू कमी करीत कूल डाऊन केलं पाहिजे. आपल्या हार्ट रेट हळूहळू कमी झाला पाहिजे. नाहीतर हृदयावर ताण येऊ शकतो.
* डाएटकडे लक्ष देणं आवश्यक. पेट्रोलशिवाय गाडी चालू शकत नाही हे यासंदर्भातलं मूलभूत सत्य. त्यामुळे सायकलिंगला निघण्याच्या साधारण अर्धा तास आधी थोडंफार लाइट फूड घेऊनच घराबाहेर पडायला हवं. मग ते अगदी एखाद-दुसरं केळ, दोन-तीन बिस्किटं का असेना. पण शरीराला त्याची गरज असते. सायकलिंग झाल्यानंतरही साधारण पाऊण तासाच्या आत हाय प्रोटिन आणि काबरेहायड्रेटयुक्त आहार घेतला पाहिजे; ज्याला शास्त्रीय परिभाषेत ‘गोल्डन विंडो’ असं म्हटलं जातं. 
* सायकलिंग आरोग्यासाठी चांगलं आहे म्हणून ‘अति’ही नको. शरीराला व्यायामाची जशी गरज असते, तशीच विश्रंतीचीही. त्यासाठी कोणत्याही स्पोर्ट्समध्ये ‘रेस्ट अॅण्ड रिकव्हरी’ ही संज्ञा वापरली जाते. तुम्ही जर योग्य प्रमाणात रेस्ट, विश्रंती घेतली तरच तुमची झालेली ङिाज भरून निघू शकेल. व्यायाम करूनही तुम्हाला गळपटलेलंच वाटणार असेल तर अशा व्यायामाचा काहीच फायदा नाही. उससे लेने के देनेही पडेंगे.
 
- मितेन ठक्कर
सायकलिंगचे आंतरराष्ट्रीय प्रशिक्षक आणि माजी राष्ट्रीय सायकलपटू,
‘रॅम’ सायकल स्पर्धा विजेते नाशिकचे डॉ. हितेंद्र व महेंद्र महाजन तसेच अनेक राज्य, राष्ट्रस्तरीय सायकलपटूंचे प्रशिक्षक.
cyclozeal@gmail.com
 
मुलाखत आणि शब्दांकन - ऑक्सिजन टीम