ब्लिंग स्टाइल करा आणि थर्टी फस्टच्या पार्टीला उठून दिसा!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 27, 2018 07:10 AM2018-12-27T07:10:23+5:302018-12-27T07:15:03+5:30
सध्या उत्सवी माहौल आहे.मस्त पार्टी करण्याचे दिवस;पण त्या पार्टीसाठी स्टाइल कशी हवी?
-श्रुती साठे
भरजरी, सिल्कच्या साड्या, सुंदर अनारकली ड्रेस, सलवार सूट हे तर सारं आपल्याला हवंसं वाटतंच. पण आता वेध लागलेत नवीन वर्षाच्या स्वागताचे आणि त्यावेळी करायच्या जल्लोषाचे! ख्रिसमस आणि 31 डिसेंबर या दोन दिवशी आणि मधले 5-6 दिवस अतिशय उत्साहाचे, पार्टी मूडचे असतात. कोणाच्या घरी पार्टी तर कधी गेट टुगेदर, कधी फक्त मित्र-मैत्रिणींची पार्टी! यासाठी प्रत्येकीला वेगळं आणि उठून दिसायचं असतं. यासाठी मग आपल्याकडे ट्रेण्डी कपडे असणं, त्यावर शोभणारी ज्वेलरी, शूज, बॅग्स असणं गरजेचंच होतं. न्यू इयर पार्टीसाठी सेलेब्सच्या स्टाइल्सचा नक्की विचार करा. थोडं कॉपी केलं तरी चालतं अशावेळी!
मागील आठवड्यातल्या सोशल मीडिया समिटसाठी करिना कपूर मिररवर्क असलेल्या स्लिव्हलेस ड्रेसमध्ये अतिशय मोहक दिसली. हा अँकल लेन्थ बॉडीकॉन ड्रेस त्याच्या टर्टल नेक स्टाइलमुळे अतिशय सुरेख दिसली. करिनाने सिल्व्हर स्टिलेटोज अर्थातच उंच टाचेचे सॅण्डल्स घातले होते.
अनुष्का शर्मा आणि कतरिना या झिरो चित्नपटाच्या प्रसिद्धीसाठी एकत्र दिसल्या होत्या ब्लिंग ड्रेसमध्ये. अनुष्काचा फुल लेन्थ ब्लिंग ड्रेस त्याच्या लांब बाह्या आणि प्रिन्सेस कट यामुळे सुरेख दिसला. कतरिनाचा फिकट गुलाबी ब्लिंग ड्रेस शॉर्ट लेन्थ आणि स्ट्रॅपी स्टाइलमुळे उठून दिसला.
एकंदरतीच ब्लिंग स्टाइल ट्रेण्डमध्ये आहे. तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही ब्लिंग ड्रेसमध्ये फुल स्लिव्ह, स्लिव्हलेस असे पर्याय निवडू शकता. हल्ली शॉर्ट ड्रेसपेक्षा अँकल लेन्थ, फुल लेन्थला जास्त पसंती मिळताना दिसते. यावर तुम्ही डेनिम जॅकेट, एखादा श्रग असंही वापरू शकता. ब्लिंग ड्रेस किंवा टॉप हे ऑल इन इटसेल्फ समजले जाते. असे कपडे निवडताना ज्वेलरी अगदी कमी वापरावी, नाही वापरली तरी चालते.
( समाप्त)